मुंबई, 03 मार्च : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहवीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली आहे. इतिहार-भूगोल सारखे विषय जर नीट अभ्यास केला तर हे विषय आपल्याला मार्क मिळवून देणारे असतात. यामध्ये नकाशा, सनावळी आणि उत्तर लिहिण्याची पद्धत यामध्ये आपण मार्क घालवतो. धडे जर व्यवस्थित वाचले असतील तर आपण सगळे प्रश्न नीट सोडवू शकतो. त्यामुळे या विषयांना धड्यांचं चातकाच्या नजरेनं धड्यांचं वाचन करायला हवं. यासाठी मागील वर्षीच्या काही प्रश्न पत्रिका पाहायला हव्यात. शेवटच्या क्षणी सगळे मागच्या वर्षीचे पेपर पाहायला वेळ नसतो म्हणून आम्ही खास Sample Paper दिला आहे. तो पाहा.
भूगोल
उत्तर लिहिताना सन, साल, नियम चुकणार नाहीत याची काळजी घ्या. पेपर साधारण 30 ते 35 पानांचा असतो. याशिवाय सप्लिमेंटची सुविधा असते. त्यामुळे पेपर सुटसुटीत आणि स्वच्छ वाटेल असा सोडवा. त्याचा परिणाम आपल्या गुणांवर होत असतो. अक्षर बारी किंवा फार मोठं असेल तर मोकळं आणि योग्य जागा सोडून लिहावं. ज्यामुळे पेपर दिसायला सुटसुटीत दिसेल. बऱ्याचवेळा आपल्याकडे मुद्दे खूप असतात अशावेळी क्रमांक टाकून मुद्दा आणि त्यामध्ये दोन ते तीन ओळीमध्ये उत्तर मांडण्याचा प्रयत्न करावा.
उत्तर पत्रिका लिहिताना किमान वाचनीय अक्षरात आणि स्वच्छ दिसेल अशी लिहावी. खाडाखोड झाली असेल तर एक रेष मारून पुढे जावे. एकाच वेळी चार रेषा मारल्यामुळे उत्तर पत्रिका वाईट दिसते.