मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Success Story: सायंटिस्ट श्रेयसीनं उंचावली देशाची मान; जगातील मोठ्या संशोधन संस्थेकडून मिळाला पुरस्कार

Success Story: सायंटिस्ट श्रेयसीनं उंचावली देशाची मान; जगातील मोठ्या संशोधन संस्थेकडून मिळाला पुरस्कार

सायंटिस्ट श्रेयसी आचार्य

सायंटिस्ट श्रेयसी आचार्य

तिच्या फिजिक्स संबंधीच्या रिसर्च पेपरला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. त्यामुळे जगभरातून श्रेयसीच्या या कार्याचं कौतुक होत आहे.

मुंबई, 17 ऑगस्ट: भारत हा विकसनशील देश आहे हे आपण आजपर्यंत ऐकत आलो आहोंत. मात्र आपल्या भारतात जगाचा गुरु होण्याची ताकद आहे. आपल्या देशातील सायंटिस्ट आपल्या देशाला मोठं करून पुढे घेऊन जाण्याच्या कामात मोठा वाटा उचलत आहेत. अशा एका भारताच्या मुलीनं जगात देशाचं नाव मोठं केलं आहे. सिलीगुडीच्या श्रेयसी आचार्याचा जगातील टॉप शास्त्रज्ञांच्या यादीत समावेश झाला आहे. तिच्या फिजिक्स संबंधीच्या रिसर्च पेपरला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. श्रेयसीचे नाव जगातील इतर चार प्रतिभावान संशोधकांसोबत जोडलं गेलं आहे. त्यामुळे जगभरातून श्रेयसीच्या या कार्याचं कौतुक होत आहे.

सिलीगुडी नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 24, भारतनगर येथील रहिवासी असलेल्या श्रेयसीनं तिच्या पालकांची तिच्या शहराचीच नाही तर संपूर्ण देशाची मान उंचावली आहे. श्रेयसीला तिच्या उत्कृष्ट शोधनिबंधासाठी युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लियर रिसर्च किंवा CERN या जगातील सर्वात मोठ्या वैज्ञानिक संस्थेने एलिस थीसिस पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

शालेय पुस्तकांमध्ये कोणते बदल आहेत आवश्यक? शिक्षण मंत्रालयाला हवंय तुमचं मत

सत्येंद्रनाथ बोस यांचे नाव बिग बँग थिअरी किंवा गॉड पार्टिकलमागील शास्त्रज्ञांशी जोडले गेले होते. त्यानंतर आता श्रेयसीचं नाव जोडण्यात आलं आहे. श्रेयसीचा रिसर्च पेपर हा बिग बँग नंतर प्रोटॉन-कणांच्या टक्कर नंतरच्या क्षणी निर्माण झालेल्या कणांवर लिहिलेला होता. गेल्या वर्षाच्या शेवटी, श्रेयसीने तिचा बिग बँगवर प्रबंध लिहिला. कारण ती भारतीय CERN ची सहयोगी सदस्य आहे. त्यामुळे तिला CERN मध्ये संशोधन करण्याची संधी मिळाली.

श्रेयसीने बारावीपर्यंत सिलीगुडीमध्ये विज्ञानाचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर जाधवपूर विद्यापीठात भौतिकशास्त्राचे शिक्षण घेतले. तिथून तिने भाभा अणु संशोधन केंद्रात संशोधक म्हणून काम केले. तिने 2021 पासून CERN मध्ये काम करण्यास सुरुवात केली. श्रेयसी सध्या फ्रान्समधील एलिस संशोधकांसोबत संशोधन करत आहे. गेल्या आठवड्यात CERN येथे एलिस सप्ताह साजरा करण्यात आला तेव्हा ती त्यात सामील झाली होती.

देशात येणार सरकारी नोकऱ्यांची लाट; इंडिया पोस्टतर्फे 1 लाख जागांसाठी मेगाभरती

याच एलिस सप्ताहमध्ये तीन आपले रिसर्च पेपर सादर केले. तिथे श्रेयसीचा रिसर्च पेपर सर्वोत्कृष्ट म्हणून ओळखला गेला. श्रेयसी आचार्य या संदर्भात म्हणाली, “मला एवढी सन्माननीय मान्यता मिळेल असे वाटले नव्हते. अर्थात, माझ्या पालकांसह माझ्या सर्व प्राध्यापकांनी आणि हितचिंतकांनी यात हातभार लावला आहे.”

संशोधक विद्वानाचे वडील परिमल आचार्य म्हणाले, “आम्हाला श्रेयसीचा खूप अभिमान आहे. जेव्हा मी पहिल्यांदा बातमी ऐकली तेव्हा मी आनंदाने अवाक झालो होतो."

First published:

Tags: Career, Education, Research, Science, Success story