मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Medical क्षेत्रात शिक्षण घ्यायचंय? मग NIRF रँकिंगनुसार 'ही' आहेत देशातील टॉप 25 कॉलेजेस; बघा लिस्ट

Medical क्षेत्रात शिक्षण घ्यायचंय? मग NIRF रँकिंगनुसार 'ही' आहेत देशातील टॉप 25 कॉलेजेस; बघा लिस्ट

देशातील टॉप 25 कॉलेजेस

देशातील टॉप 25 कॉलेजेस

नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) या भारतातील वैद्यकीय महाविद्यालयांची रँकिंग करणाऱ्या संस्थेच्या रँकिंगनुसार ही कॉलेजेसची लिस्ट देण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया.

    मुंबई, 16 ऑगस्ट: नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) 2022 चा निकाल लवकरच जाहीर होणार असल्याने, विद्यार्थ्यांनी पुढच्या टप्प्यासाठी तयारी करणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये त्यांच्या NEET क्रमांकानुसार आणि महाविद्यालयांच्या निवडीनुसार जागा वाटप केल्या जात असताना, देशातील सर्वोच्च मेडिकल कॉलेजेसची लिस्ट जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे. भारतातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश फक्त NEET द्वारे केले जातात, तर परदेशातील महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया असतात. यंदा 18 लाखांहून अधिक विद्यार्थी त्यांच्या NEET 2022 च्या निकालाची वाट पाहत आहेत. म्हणूनच आज आम्ही देशातील काही टॉप मेडिकल कॉलेजेसची लिस्ट सांगणार आहोत. नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) या भारतातील वैद्यकीय महाविद्यालयांची रँकिंग करणाऱ्या संस्थेच्या रँकिंगनुसार ही कॉलेजेसची लिस्ट देण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया. तुम्हालाही इंजिनिअर व्हायचंय? मग 'ही' आहेत राज्यातील टॉप Engineering Colleges; NIRF रँकिंगमध्येही अव्वल रँक 1: एम्स दिल्ली रँक 2: PGMIER, चंदीगड रँक 3: ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोर रँक 4: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस, बंगलोर रँक 5: BHU रँक 6: जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च रँक 7: संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रँक 8: अमृता विश्व विद्यापीठम रँक 9: श्री चित्रा तिरुनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी, तिरुवनंतपुरम रँक 10: कस्तुरबा मेडिकल कॉलेज, मणिपाल रँक 11: किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी रँक 12: मद्रास मेडिकल कॉलेज आणि सरकारी जनरल हॉस्पिटल, चेन्नई रँक 13: युनिव्हर्सिटी ऑफ Liver and Biliary सायन्सेस रँक 14: सेंट जॉन्स मेडिकल कॉलेज रँक 15: श्री रामचंद्र उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था रँक 16: एम्स जोधपूर रँक 17: डॉ डीवाय पाटील विद्यापीठ रँक 18: शिक्षा `ओ` अनुसंधन रँक 19: वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज आणि सफदरजंग हॉस्पिटल रँक 20: SRM IST रँक 21: पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था #NayeBharatKaNayaCurriculum: शालेय पुस्तकांमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करावा? शिक्षण मंत्रालयानं मागितलं लोकांचं मत रँक 22: AMU रँक 23: मौलाना आझाद मेडिकल कॉलेज रँक 24: दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रँक 25: सवेथा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड टेक्निकल सायन्सेस
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Medical exams

    पुढील बातम्या