मराठी बातम्या /बातम्या /करिअर /SBI Clerk Prelims 2021 : आजपासून सुरू झालेल्या परीक्षांना जाताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

SBI Clerk Prelims 2021 : आजपासून सुरू झालेल्या परीक्षांना जाताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

sbi

sbi

पूर्वपरीक्षा देणारे उमेदवार sbi.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अधिक माहिती घेऊ शकतात.

    स्टेट बँक ऑफ इंडिया (State bank of India) अर्थात एसबीआयच्या क्लार्क पदासाठीच्या पूर्वपरीक्षा (SBI Clerk Prelims 2021) आजपासून म्हणजेच 10 जुलै 2021पासून सुरू झाल्या आहेत. काही अपरिहार्य कारणामुळे शिलॉंग, आगरतळा, औरंगाबाद (Aurangabad)आणि नाशिकमधली (Nashik) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. अन्य केंद्रांमधून SBI क्लर्क पूर्वपरीक्षा देणारे उमेदवार sbi.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अधिक माहिती घेऊ शकतात.

    'SBI क्लर्क प्रीलिम्स 2021' 10, 11, 12, 13 जुलै रोजी देशभरातल्या विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहेत. या भरती परीक्षेद्वारे SBI ज्युनियर असोसिएट्सची (Junior Associate) 5237 रिक्त पदं भरली जाणार आहेत. उमेदवारांनी परीक्षेला जाण्यापूर्वी खाली दिलेल्या मार्गदर्शक सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. मनीकंट्रोल डॉट कॉमने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

    SBI Clerk Prelims 2021: परीक्षेच्या दिवसासाठी सूचना

    उमेदवारांनी त्यांचं प्रवेशपत्र (Admit Card) अगोदरच डाउनलोड करणं आवश्यक आहे. परीक्षेला जाताना ते घेऊन जाणं आवश्यक आहे.

    परीक्षा वेळेच्या किमान 90 मिनिटं आधी केंद्रांवर पोहोचावं.

    उमेदवारांना केवळ प्रवेशपत्र, वैध फोटो आयडी ( Valid Photo ID) आणि परीक्षेदरम्यान कोविड-19 (Covid-19) पासून सुरक्षिततेसाठी आवश्यक वस्तू घेऊन जाण्याची परवानगी आहे.

    हे वाचा - Interview वेळी पगाराबद्दल बोलताना चुकूनही करू नका ही कामं; अन्यथा जाईल नोकरी

    अर्ज प्रक्रियेदरम्यान अपलोड केलेल्या फोटोच्या दोन अतिरिक्त कॉपी सोबत घेऊन जाव्यात.

    परीक्षेच्या वेळी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं गॅजेट किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरण्याची परवानगी नाही.

    COVID-19 विषयक सूचना

    उमेदवारांनी कोविड-19 पासून सुरक्षिततेसाठी मास्क, स्वतःचा हँड सॅनिटायझर, बॉलपॉइंट पेन आणि पाण्याची पारदर्शक बाटली या आवश्यक वस्तू घेऊन जाव्यात.

    उमेदवारांनी परीक्षा केंद्रांवर सुरक्षित अंतराचं पालन करावं.

    उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये मास्क काढण्यास परवानगी नाही.

    परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना थर्मल स्कॅनिंगला सामोरं जावं लागेल.

    SBI क्लर्क पूर्वपरीक्षेला उपस्थित राहणाऱ्या सर्व उमेदवारांनी परीक्षेदरम्यान कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू नये, याकरिता परीक्षेच्या दिवशी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. तसंच ॲडमिट कार्डशिवाय परीक्षेला बसता येणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

    First published:

    Tags: Examination, Sbi bank job