मुंबई, 16 जून : शालेय जीवनातील सर्वात महत्त्वाची अशी दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावीच्या निकालाची ही परीक्षा देणारे सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा संपली आहे. हा निकाल उद्या म्हणजेच शुक्रवारी 17 जून रोजी जाहीर होणार आहे. किती वाजता जाहीर होणार निकाल? दरवर्षी प्रमाणे यंदाही दहावी बोर्डाचा निकाल हे सुमारे दुपारी एक वाजता जाहीर होणार आहेत. हे सर्व निकाल ऑनलाईन पद्धतीनं पोर्टलवर जाहीर होणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
असा चेक करा निकाल?
इयत्ता 10वीचा महाराष्ट्र SSC निकाल तपासण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी सुरुवातीला www.mahresult.nic.in या महाराष्ट्र बोर्डाच्या निकाल पोर्टलच्या अधिकृत वेबपेजला भेट द्या. SSC परीक्षेसाठी MSBSHSE निकालासाठी अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर SSC परीक्षेचा निकाल हा पर्याय येईल ज्यावर विद्यार्थ्यांना पुढील वेब पेजवर भेट देण्यासाठी क्लिक करा. यानंतर आईचे नाव आणि रोल नंबर ही महत्त्वाची क्रेडेन्शियल्स टाकण्यास विसरू नका. विद्यार्थ्यांना दोन्ही आवश्यक क्रेडेन्शियल्स भरावे लागतील आणि नंतर View Result पर्यायावर क्लिक करा. तुमचा निकाल तुमच्या समोर असेल. पुढील रेफरन्ससाठी निकाल डाउनलोड किंवा सेव्ह करून ठेवा.
निकालाची प्रिंट घ्या निकाल हा ऑनलाईन पद्धतीनं जरी इंटरनेटवर दिसत असला तरीही क्रॉस चेक केल्यानंतर निकालाच्या दोन ते तीन प्रिंट्स घेऊन ठेवणं आवश्यक आहे. कॉलेजमधून निकालाची ओरिजनल प्रिंट मिळण्यासाठी अनेक दिवस लागतात. मात्र तेवढ्यात 11 वी आणि इतर प्रवेश सुरु होत आहेत. म्हणूनच निकालाची प्रिंट घेऊन ठेवणं आवश्यक आहे. निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ : http://mahresult.nic.in http://sscresult.mkcl.org https://ssc.mahresults.org.in https://lokmat.news18.com