नवी दिल्ली, 23 जुलै : रेल्वे खात्यात नोकरी (Job) शोधत असलेल्या तरुणांसाठी चांगली बातमी आहे. नॉर्दर्न रेल्वेमध्ये (Northern railway) काही पदांसाठी उमेदवार भरले जाणार (Recruitment) असून त्यासाठी लेखी परीक्षेची (written exams) अट नसणार आहे. केवळ मुलाखतीद्वारे (interview) या पदावरील उमेदवार भरले जाणार असून 27 आणि 28 जुलैला वॉक-इन इंटरव्ह्यू द्वारे ही पदं भरली जाणार असल्याची माहिती नॉर्दन रेल्वेनं काढलेल्या प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली आहे. या पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार दरमहा 67700 रुपयांपासून 208700 रुपये दरमहा या दरम्यान वेतन मिळणार आहे. याशिवाय त्याला जोडून मिळणारे इतर भत्ते वेगळे असतील. इच्छुकांनी आपले अर्ज https://nr.indianrailways.gov.in/nr/recruitment/1626097034854_SR_Ad-NP_Website-July-2021-converted.pdf या लिंकवर भरावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे. 27 जुलैला होणार या पदाच्या मुलाखती 27 तारखेपासून विविध पदांसाठीच्या मुलाखतींना सुरुवात होणार असून यामध्ये ऍनास्थेशियासाठी 1 जागा, ईएनटी साठी 1जागा, जनरल मेडिसीनसाठी 12 जागा, जनरल सर्जरीसाठी 6 जागा, मायक्रोबायोलॉजीसाठी 1 जागा, स्त्रीरोग तज्ज्ञांची 1 जागा अशी पदं आहेत. 28 जुलैला होणार या पदाच्या मुलाखती कॅन्सर विज्ञानसाठी 1 जागा, अस्थि रोग तज्ज्ञांची 2 पदं, डोळे विज्ञानाचं 1 पद, पेडियाट्रिक्समध्ये 1 पद आणि रेडियोलॉजीसाठी 2 पदांची भरती होणार आहे. या पदांसाठीच्या मुलाखती 28 जुलै रोजी घेतल्या जाणार आहेत. हे वाचा - ICSE, ISC Result 2021: दहावी-बारावीच्या निकालाची तारीख जाहीर, कसा पाहाल निकाल? तीन वर्षांच्या अनुभवाची गरज या पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरण्यासाठी उमेदवाराकडे कमीत कमी 3 वर्षांचा कार्यानुभव असणं बंधनकारक असणार आहे. याशिवाय त्या त्या क्षेत्रातील मान्यताप्राप्त संस्थांमधून पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. या पदासाठी जनरल श्रेणीतील वयोमर्यादा 40 वर्षं, ओबीसीसाठी 43 वर्षं आणि अनुसुचित जाती आणि अऩुसुचित जमातींसाठी 45 वर्षं अशी निश्चित करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







