• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • RBI Internship: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये इंटर्नशिपची सर्वात मोठी संधी; अशा पद्धतीनं लगेच करा अर्ज

RBI Internship: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये इंटर्नशिपची सर्वात मोठी संधी; अशा पद्धतीनं लगेच करा अर्ज

या इंटर्नशिपसाठी (How to register for RBI Internship)अर्ज कसे करायचे आणि त्यासाठी पात्रता (Eligibility for RBI Internship) काय असेल? याबाबत माहिती

 • Share this:
  मुंबई,15 नोव्हेंबर: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (RBI Summer Internship 2022) इंटर्नशिप करण्याची ही सुवर्णसंधी आहे. RBI नं वार्षिक उन्हाळी इंटर्नशिप कार्यक्रम (RBI Summer Internship 2022) जाहीर केला आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेले तरुण/ तरुणी रिझर्व्ह बँकेत इंटर्नशिपसाठी (Top Internship programs in India) अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे यामध्ये देशासह परदेशात राहणारे विद्यार्थीही अर्ज करू शकणार आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या इंटर्नशिपसाठी (How to register for RBI Internship)अर्ज कसे करायचे आणि त्यासाठी पात्रता (Eligibility for RBI Internship) काय असेल? याबाबत माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank od India career) मधील इंटर्नशिप अर्थशास्त्र, बँकिंग, वित्त यासह अनेक विभागणामध्ये असणार आहे. या इंटर्नशिपद्वारे एकूण 125 इंटर्न निवडले जातील. ही इंटर्नशिप एप्रिल 2022 मध्ये सुरू होईल. निवडलेल्या इंटर्नला फक्त मुंबई स्थित बँकेच्या केंद्रीय कार्यालय विभागांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. हे असतील पात्रतेचे निकष मॅनेजमेंट, कॉमर्स, स्टॅटिस्टिक्स, लॉ, अर्थशास्त्र, बँकिंग, वित्त या विषयात पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात. तीन वर्षांची व्यावसायिक पदवी पूर्ण केलेले विद्यार्थीही अर्ज करू शकतात. मॅनेजमेंट, कॉमर्स, स्टॅटिस्टिक्स, लॉ इत्यादी विषयांचे शिक्षण घेत असलेले परदेशी विद्यार्थी अर्ज करू शकतात. Career Tips: B.Sc नंतर करिअरचे अनेक मार्ग; 'हे' काही कोर्सस घडवतील करिअर अशी होणार निवड अर्जांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. निवडलेल्या विद्यार्थ्यांची जानेवारी आणि फेब्रुवारी 2022 मध्ये मुलाखत घेतली जाईल. अंतिम निकाल मार्च 2022 मध्ये घोषित केले जाणार आहेत. अशा पद्धतीनं करा अप्लाय rbi.org.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज केले जाऊ शकतात. परदेशी विद्यार्थ्यांना पोस्टाद्वारे अर्ज पाठवावा लागेल. अर्जाचा फॉर्म मुख्य महाव्यवस्थापक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मानव संसाधन व्यवस्थापन विभाग , केंद्रीय कार्यालय, 21 वा मजला, मध्यवर्ती कार्यालय इमारत, शहीद भगतसिंग रोड, मुंबई – 400001 येथे पाठवावा लागेल. यासह एक प्रत cgminchrmd@rbi.org.in या ई-मेलवर पाठवावी लागणार आहे.
  Published by:Atharva Mahankal
  First published: