मुंबई, 03 मे: उत्तर रेल्वेने 2022-23 या वर्षासाठी स्पोर्ट्स कोट्यासाठी पात्र खेळाडूंकडून नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत. उत्तर नॉर्दर्न रेल्वे रिक्रुटमेंट 2023 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, 21 जागा रिक्त आहेत. निवडलेल्या उमेदवारांना 81100 रुपयापर्यंत मासिक वेतन मिळेल. या पदांसंदर्भातील इतर महत्त्वाचे तपशील जाणून घेऊयात. याबद्दल ‘स्टडी कॅफे’ने वृत्त दिलंय. पदाचे नाव व रिक्त जागा आर्चरी पुरुष - दोन जागा, जिम्नॅस्टिक पुरुष - सहा, हँडबॉल पुरुष - दोन, क्रिकेट महिला- दोन, बास्केटबॉल महिला - दोन, बॅडमिंटन पुरुष - दोन, बॅडमिंटन महिला - दोन जागा, कबड्डी पुरुष - दोन, बॉडी बिल्डिंग पुरुष - दोन जागा.
शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. उमेदवारांनी 12वी (10+2 ) किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त संस्थेतून पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे. महिन्याचा तब्बल 70 हजार रुपये पगार; भारत सरकारच्या दूरसंचार विभागात जॉबची सर्वात मोठी संधी; करा अप्लाय खेळ पात्रता 1 एप्रिल 2020 पासून अधिसूचना जारी केल्याच्या तारखेपर्यंत मधल्या काळात झालेल्या स्पर्धांमध्ये ज्या खेळाडूंनी आवश्यक असलेली पात्रता पूर्ण केली आहे, अशाच खेळाडूंना या पदासाठी अर्ज करता येईल, तसेच ते खेळाडू आताही कार्यरत असणं आवश्यक आहे. या सर्व पदांसाठी स्पोर्ट्स कोटाअंतर्गत ते अर्ज करू शकतात. स्पोर्ट्स अचिव्हमेंट वैधतेसाठी चॅम्पियनशिप, इव्हेंटचा समारोपाचा दिवस विचारात घेतला जाईल. विशिष्ट डिसिप्लीनमध्ये खेळ खेळला असल्यास ते ऑनलाइन अर्जात नमूद करावे. वर नमूद केलेल्या सर्व चॅम्पियनशिप आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य स्पोर्ट्स फेडरेशन व रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डद्वारे (RSPB) मान्यताप्राप्त अथॉरिटीकडून आयोजित केल्या गेल्या पाहिजेत. Success Story: कधीकाळी वडीलांचा होता हातठेला अन् मुलानं उभी केली तब्बल 400 कोटींची कंपनी हाय लेव्हलसाठी स्पोर्ट्स मानदंड असलेल्यांनी लोअर लेव्हलवरील रिक्त जागांसाठी अर्ज केल्यावर त्यांनी ज्या लेव्हलमध्ये अर्ज केलाय, त्यासाठीच त्यांचा विचार केला जाईल. अशा प्रकरणांमध्ये, खेळाडूला हमीपत्र द्यावे लागते की तो किंवा ती रेल्वेत रुजू झाल्यानंतर उच्च पदासाठी दावा करणार नाही. पात्रता कामगिरी व पदाव्यतिरिक्त स्पोर्ट्स कोट्याच्या भरतीचे किमान नियम खालीलप्रमाणे असतील. फ्रेशर्स उमेदवारांसाठी मोठी खूशखबर! ‘ही’ मोठी IT कंपनी येत्या वर्षी 15,000 जणांना देणार नोकरी वयोमर्यादा या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 18 वर्ष व कमाल वय 25 वर्षं असावं. पगार निवडलेल्या उमेदवारांना 2, 3, 4 आणि 5 पे स्केलवर मासिक पगार मिळेल. BMC Recruitment: 1,00,000 रुपये..हो, इतका मिळेल महिन्याचा पगार; मुंबई महापालिकेत बंपर भरती; करा अप्लाय अर्ज फी या पोस्टसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 500 अर्ज फी भरावी लागेल. SC, ST, महिला, अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय उमेदवारांना 250 रुपये अर्ज फी भरावी लागेल. आधी नॉक करावं की आधी दार उघडावं? मुलाखतीच्या रूममध्ये जाताना कसं बनेल पहिलं इम्प्रेशन? या घ्या टिप्स अर्ज कसा करायचा नॉर्दर्न रेल्वे रिक्रुटमेंट 2023 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, इच्छुक आणि पात्र भारतीय उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. इतर कोणत्याही पद्धतीने केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 03.05.2023 रोजी सुरू होईल आणि अंतिम तारीख 02.06.2023 आहे.