मुंबई, 21 ऑक्टोबर: सरकारी नोकरीची प्रतीक्षा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून एक मोठी खुशखबर आली आहे. राज्य सरकार लवकरच येत्या काही महिन्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागात तब्बल 10,127 जागांसाठी मेगाभरती होणार आहे अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. त्यामुले सरकारी नोकरीची प्रतीक्षा करत असलेल्या उमेदवारांसाठी हे दिवाळीचं मोठं गिफ्ट असणार आहे. Indian Army मध्ये थेट अधिकारी पदावर नोकरीची संधी; तुम्ही आहात का पात्र? राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, लॅब टेक्निशियन अशा अनेक पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे अशी माहिती महाजन यांनी दिली आहे. या पदभरती संदर्भातील ऑफिशिअल नोटिफिकेशन लवकरच जरी करण्यात येणार आहे अशीही माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
या पदभरती संदर्भातील काही महत्त्वाच्या तारखा पदभरतीच्या एकूण जागा - 10,127 ऑफिशिअल नोटिफिकेशन जारी होण्याचा कालावधी - 01 जानेवारी 2023 - 07 जानेवारी 2023 परीक्षांची तारीख - 25 मार्च 2023 आणि 26 मार्च 2023 निकाल जाहीर होण्याचा कालावधी -27 मार्च ते 27 एप्रिल 2023 1-2 नव्हे तब्बल 1535 जागांसाठी मेगाभरती; इंडियन ऑइल मिटवणार बेरोजगारांची चिंता गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षेत प्रचंड घोटाळा झाल्याची माहिती समोर आली होती. काही ठिकाणी परीक्षाही रद्द कराव्या लागल्या होत्या. गैरव्यवहार झाला होता. मात्र यंदाही तसंच काही होऊ नये असं उमेदवाराचं म्हणणं आहे. जे विद्यार्थी वर्षानुवर्षे आरोग्य विभागाच्या परीक्षांसाठी किंवा सरकारी नोकरीसाठी वाट बघत आहेत अशा उमेवारांना या भरतीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे ही परीक्षा होऊन निकाल लागल्यानंतर वेळेत उमेदवारांना पोस्टिंग मिळावं अशीच अपेक्षा उमेदवारांची आहे.