जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Office Tips: आताच बंद करा 'या' वाईट सवयी; अन्यथा सुरुवात होण्याआधीच संपेल तुमचं Career

Office Tips: आताच बंद करा 'या' वाईट सवयी; अन्यथा सुरुवात होण्याआधीच संपेल तुमचं Career

वाईट सवयी ज्या तुम्ही ऑफिसमध्ये टाळणं आवश्यक आहे.

वाईट सवयी ज्या तुम्ही ऑफिसमध्ये टाळणं आवश्यक आहे.

आज आम्ही तुम्हाला अशा काही चुका (Mistakes to avoid at workplace) आणि वाईट सवयी सांगणार आहोत ज्या तुम्ही ऑफिसमध्ये टाळणं आवश्यक आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 फेब्रुवारी: सध्या सर्वत्र कोरोनानं थैमान (Corona) घातलं आहे. यामुळे अनेकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. काही लोकांना आपला जॉब कोरोनामुळे गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीमध्ये आत्मविश्वासानं (How to build Confidence) हातात असलेली नोकरी (Latest jobs) टिकवून ठेवणं आणि चांगलं काम करत राहणं आवश्यक आहे. मात्र जर तुम्हाला काही वाईट सवयी (Bad Habits at workplace) असतील आणि या सवयी तुम्ही ऑफिसमध्ये किंवा कामाच्या जागेवर बंद करत नसाल तर तुमचं संपूर्ण करिअर (Career Tips) धोक्यात येऊ शकतं. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही चुका (Mistakes to avoid at workplace) आणि वाईट सवयी सांगणार आहोत ज्या तुम्ही ऑफिसमध्ये टाळणं (Habits to avoid at Office) आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेउया. स्वतःच्या कामाबद्दल न सांगणे बरेचदा तुम्ही केलेलं काम तुम्ही सोडून इतर कोणालाही माहिती नसतं. यामुळे तुम्ही चांगली कामगिरी करूनही ते कोणाच्या लक्षात येत नाही. म्हणूनच तुम्ही जे काही करत आहात, तुम्ही जी कामे करत आहात ती तुमच्या सिनिअर्सना आणि मॅनेजर्सना कळावीत. काम किरकोळ किंवा मोठे स्वरूपाचे असो किंवा ते फक्त क्लायंटचे कौतुक असो, तुमच्या व्यवस्थापकाला किंवा बॉसला त्याबद्दल सांगा. यामुळे तुमच्या बॉससमोर तुमची विश्वासार्हता वाढेल. तुमच्या प्रयत्नांसाठी तुमचे नक्कीच कौतुक होईल. विद्यार्थ्यांनो, उत्तर लिहिण्याची घाई करू नका; अशा पद्धतीनं प्रश्न घ्या समजून सतत खोटं बोलणे तुम्ही अनेकदा तुमच्या बॉसशी खोटे बोलता, कदाचित रजेची मंजुरी घेण्यासारख्या लहान कारणासाठी, जे कर्मचारी सहसा करतात. खोटे बोलणे तुम्हाला काही काळासाठी वाचवू शकते, परंतु नियमित खोटे बोलणे तुम्हाला अडचणीत आणू शकते. जर तुम्ही पकडला गेलात तर तुम्ही तुमची विश्वासार्हता नष्ट कराल आणि ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला परत मिळणार नाही. प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता पैशापेक्षा मोठी आहे, पैसे गमावले तरीही तुम्ही कमवू शकता, परंतु ते गमावले तर तुम्ही कधीही आदर आणि विश्वास मिळवू शकत नाही. जरी तुम्ही खोटे बोलणे बंद केले असले तरी पुन्हा कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. म्हणूनच ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी किंवा बॉसशी खोटे बोलू नका. Career Tips: इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये करिअरच्या अनेक संधी; कसे कमवाल पैसे; वाचा निष्काळजीपणा दाखवू नका काम लहान असो वा मोठे, निष्काळजीपणा दाखवल्याने तुमचा विश्वास नष्ट होतो. काहीवेळा तुम्ही जे बोलता ते तुम्ही करत नाही किंवा जर तुम्ही ते केले तर ते किमान महत्त्वाचे किंवा काहीही मूल्यवान नसते. जर तुम्ही निष्काळजी किंवा अव्यवस्थित असाल तर आताच ही वाईट सवय बंद करा आणि व्यवस्थित राहायला शिका. यामुळे तुमच्या ऑफिसमध्ये तुमचा प्रभाव चांगला पडेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात