जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / पुण्यात शिकलेल्या Starbucks च्या नव्या सीईओंची सॅलरी माहितीये? आकडा वाचून तुम्हालाही येईल भोवळ

पुण्यात शिकलेल्या Starbucks च्या नव्या सीईओंची सॅलरी माहितीये? आकडा वाचून तुम्हालाही येईल भोवळ

लक्ष्मण नरसिंहन

लक्ष्मण नरसिंहन

स्टारबक्सने नक्की आपल्या नवीन CEO ला किती पगार देऊ केला आहे हा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नव्या CEO चा पगार सांगणार आहोत

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 07 सप्टेंबर: काही दिवसांआधी भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहन यांची जगातील सर्वात मोठी कॉफी शृंखला असलेल्या Starbucks चे नवीन CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्टारबक्स कॉर्पने लक्ष्मण नरसिंहन यांची पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती जाहीर केली म्हणूनच स्टारबक्सचे सीईओ म्हणून काम करताना लक्ष्मण यांना किती पगार मिळाला हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. सर्वात महागडी कॉफी विकणाऱ्या स्टारबक्सने नक्की आपल्या नवीन CEO ला किती पगार देऊ केला आहे हा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नव्या CEO चा पगार सांगणार आहोत ज्याचा आकडा ऐकून तुम्हीही चक्रावून जाल. द गार्डियनने आता आपल्या एका अहवालानुसार, जर त्यांनी त्यांचे लक्ष्य पूर्ण केलं तर स्टारबक्स लक्ष्मण नरसिंहन यांना वार्षिक तब्बल 140 कोटी रुपये पगार देईल. त्याचा पगार हिशेबात मिळणाऱ्या पगारापेक्षा अडीच पट जास्त आहे. रेकिटमध्ये त्यांना सीईओ म्हणून 55 कोटी रुपये वार्षिक पगार मिळत असे.एवढंच नाही तर दोन्ही कंपन्यांच्या मूल्यांकनातील फरकामुळे लक्ष्मण नरसिम्हन यांचं प्रोत्साहन स्टारबक्समध्येही जास्त असेल. Job Alert: SBIमध्ये 5000हून अधिक जागांसाठी भरती; कुठे कराल अर्ज? आतापर्यंत नरसिंहन हे रेकिटचे सीईओ होते. त्याआधी नरसिंहन यांनी पेप्सिकोमध्येही अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे. पेप्सिको इथे त्यांनी ग्लोबल चीफ कमर्शियल ऑफिसर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. मॅकिन्से अँड कंपनी या सल्लागार कंपनीत त्यांनी वरिष्ठ भागीदार म्हणूनही काम केलं आहे.विशेष म्हणजे लक्ष्मण यांचं भार्गाशी आणि पुण्याशी खास नातं आहे. लक्षण यांनी पुण्यातून आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. प्रदीर्घ अनुभव असलेले CEO लक्ष्मण नरसिंहन यांनी पुणे विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंग केलं आहे. 55 वर्षीय लक्ष्मण यांना आंतरराष्ट्रीय ग्राहक ब्रँड्सचे व्यवस्थापन आणि सल्लामसलत करण्याचा 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. नरसिंहन हे सप्टेंबर 2019 मध्ये रेकिट कंपनीत रुजू झाले होते. स्टारबक्ससाठी आहे अडचणींचा काळ स्टारबक्स सध्या कठीण काळातून जात आहे. यूएस मधील सुमारे 200 स्टोअरमधील कर्मचारी वाढत्या महागाईच्या अनुषंगाने चांगले फायदे आणि वेतनाची मागणी करण्यासाठी युनियन तयार करत आहेत. कोरोनाच्या निर्बंधांमुळे चीनमधील कंपनीचा व्यवसाय जवळपास ठप्प झाला आहे. कंपनीला पुन्हा नव्या उंचीवर नेण्यासाठी नरसिंहन यांच्याकडे कंपनीची कमान सोपवण्यात आली आहे. Business की IT? पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी कोणतं क्षेत्र Best? इथे मिळेल माहिती इतका असेल महिन्याचा पगार लक्ष्मण नरसिंहन यांना स्टारबक्समध्ये महिन्याला तब्बल 11 कोटी रुपये पगार मिळणार आहे. लक्ष्मण नरसिंहन ऑक्टोबर 2022 मध्ये स्टारबक्सचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारतील. नरसिंहन सीईओ पदाचा कार्यभार स्वीकारेपर्यंत, स्टारबक्सचे अध्यक्ष अंतरिम-सीईओ हॉवर्ड शुल्त्झ यांच्याकडे असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: career
  • First Published :
जाहिरात
जाहिरात