मुंबई, 15 सप्टेंबर: काही दिवसांपूर्वी NEET UG परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे आता या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी काउन्सिलिंग लवकरच सुरु होणार आहे. यंदा NEET चा कट-ऑफ गेल्या काही वर्षांपेक्षा कमी असल्यामुळे काउन्सिलिंग नक्की कसं होणार कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार? असे प्रश्न विद्यार्थ्यांना पडू लागले आहेत.
काही रिपोर्ट्सनुसार, उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी काउन्सिलिंग लवकरच सुरु होणार आहे. NEET UG काउन्सिलिंग 2022 वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर, MCC वेबसाइट mcc.nic.in वर जाऊन ते बघता येऊ शकणार आहे. मात्र आत्तापर्यंत NEET UG काउन्सिलिंग 2022 चे वेळापत्रक जारी करण्याची तारीख आणि वेळ याबद्दल MCC द्वारे कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
Central Government Jobs: महिन्याला तब्बल 1.45 लाख रुपये पगार; नीती आयोगात भरती
NEET UG काउन्सिलिंग चं वेळापत्रक केव्हाही जाहीर होऊ शकतं. अशा परिस्थितीत काउन्सिलिंग साठी आवश्यक कागदपत्रं तयार ठेवण्याचा सल्ला उमेदवारांना देण्यात आला आहे. जेणेकरून शेवटच्या क्षणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. काउन्सिलिंग साठी कोणती कागदपत्रे तयार ठेवावीत ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
ही कागदपत्रं आवश्यक
NEET रँक कार्ड
NEET प्रवेशपत्र
डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट
जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
इयत्ता 10, 12 ची मार्कशीट
Address प्रूफ
कॅरेक्टर सर्टिफिकेट
मायग्रेशन सर्टिफिकेट
वैद्यकीय आरोग्य प्रमाणपत्र
पासपोर्ट साइज फोटो इ.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Entrance Exams, Medical, Medical exams