मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

NEET UG 2021: परीक्षेसाठी आजपासून सुरु झालं रजिस्ट्रेशन; अशा पद्धतीनं भरा ऑनलाईन फॉर्म

NEET UG 2021: परीक्षेसाठी आजपासून सुरु झालं रजिस्ट्रेशन; अशा पद्धतीनं भरा ऑनलाईन फॉर्म

हे रजिस्ट्रेशन नक्की कसं करणार याबद्दल स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.

हे रजिस्ट्रेशन नक्की कसं करणार याबद्दल स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.

हे रजिस्ट्रेशन नक्की कसं करणार याबद्दल स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.

  • Published by:  Atharva Mahankal

नवी दिल्ली, 13 जुलै: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल NEET च्या UG परीक्षेची तारीख (NEET UG Exam date 2021) जाहीर केली. डॉक्टर होण्याची स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांना NEET ही परीक्षा देणं गरजेचं असतं. म्हणूनच आता NEET UG परीक्षेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन (NEET UG online Registration) सुरु करण्यात आलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना MBBS मध्ये प्रवेश (MBBS Admission 2021) हवा आहे अशा विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे.

आज म्हणजेच 13 जुलै 2021 संध्याकाळी 5 वाजतापासून या परीक्षेच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनला (How to do NEET Online Registration) सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना या रजिस्ट्रेशनसाठी त्यांच्या शिक्षणाविषयीची  आणि ओळखपत्राविषयीची माहिती द्यावी लागणार आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांना काही कागदपत्रं ऑनलाईन अपलोड करावे लागणार आहेत. हे रजिस्ट्रेशन नक्की कसं करणार याबद्दल स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.

हे वाचा - NEET Exam 2021: अखेर NEET परीक्षेचा मुहूर्त ठरला; 'या' तारखेला होणार परीक्षा

ही आहे प्रोसेस

NEET 2021 च्या अधिकृत वेबसाइटला nta.nic.in ला ओपन करा.

पेजवर जाताच तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी एक लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.

यानंतर एक नवीन पेज उघडेल. सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा आणि शेवटी दिलेल्या चेक बॉक्सवर क्लिक करा.

New Window उघडेल. या ठिकाणी नाव, लिंग असा आवश्यक तपशील भरा.

यानंतर पूर्ण फॉर्म भरा, एकदा फॉर्म पूर्ण चेक करून घ्या.

यानंतर तुम्हाला password सेट करण्याचं ऑप्शन दिसेल. इथे स्ट्रॉंग password सेट करा.

फॉर्म भरल्यानंतर विद्यार्थ्यांना फी भरण्याचं ऑप्शन येईल.

फी भरून झाल्यावर फॉर्म Save होईल. या फॉर्मचं प्रिंट आऊट जरूर घेऊन ठेवा.

फी भरताना घ्या काळजी

फी भरताना एक नवीन window ओपन होईल. अशा वेळी कार्ड डिटेल्स एंटर करताना काळजीपूर्वक करा. तसंच संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर एकदा तापसून घ्या. फी भरल्यानंतर एकदा main पेजवर येऊन तापसून घ्या.

First published: