जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / CBSE चे निकाल ते NEET परीक्षा; करिअरच्या दृष्टीने हा महिना आहे IMP; बघा टॉप इव्हेंट्स

CBSE चे निकाल ते NEET परीक्षा; करिअरच्या दृष्टीने हा महिना आहे IMP; बघा टॉप इव्हेंट्स

CBSE चे निकाल ते NEET परीक्षा; करिअरच्या दृष्टीने हा महिना आहे IMP; बघा टॉप इव्हेंट्स

इंजिनीअरिंग प्रवेशासाठी JEE Main, मेडिकलसाठी NEET आणि भारतभरातील सर्व प्रतिष्ठीत महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी नव्याने सुरू झालेल्या CUET यासह प्रमुख प्रवेश परीक्षा जुलैमध्ये होणार आहेत.

    मुंबई, 03 जुलै:   उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर (Summer Break) संपूर्ण देशभरातील शाळा (Schools) पुन्हा सुरू झाल्या आहेत. तसेच जुलैमध्ये नवीन शैक्षणिक कॅलेंडरसह (new academic calendar ) कॉलेजेस नवीन शैक्षणिक सत्रही लवकरच सुरू करणार आहेत. बहुतेक शैक्षणिक मंडळांनी त्यांच्या बोर्ड परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत. मात्र, सेंट्रल बोर्ड CBSE आणि CISCE या महिन्यात त्यांचे 10वी आणि 12वीचे निकाल जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. जुलैमध्ये कॉलेजमध्ये प्रवेशाचा हंगामही सुरू होतो. बहुतेक राज्य आणि केंद्राच्या परीक्षा जुलैमध्ये नोटिफिकेशन, अ‍ॅडमिट कार्ड्स जारी करतात. तसेच जुलैमध्ये प्रवेशासासठी परीक्षाही नियोजित करतात. इंजिनीअरिंग प्रवेशासाठी JEE Main, मेडिकलसाठी NEET आणि भारतभरातील सर्व प्रतिष्ठीत महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी नव्याने सुरू झालेल्या CUET यासह प्रमुख प्रवेश परीक्षा जुलैमध्ये होणार आहेत. या महिन्यातील सर्व प्रमुख शैक्षणिक इव्हेंट्सची यादी असलेले जुलैचे शैक्षणिक कॅलेंडर पाहूयात. CBSE 10 वी, 12वीचे निकाल बहुप्रतिक्षीत CBSE बोर्ड परीक्षांचे निकाल या महिन्यात लागतील अशी अपेक्षा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीएसई 10वीचे निकाल 4 जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे तर सीबीएसई 12वीचे निकाल 10 जुलैपर्यंत जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वी सीबीएसई निकालाच्या तारखा तसंच निकालाचा फायनल फॉर्म्युलादेखील जाहीर करेल. त्या फॉर्म्युलाच्या आधारेच पहिल्या-वहिल्या दोन-टर्मच्या बोर्डाच्या परीक्षा जाहीर केल्या जातील. सुरुवातीलाच 6 लाखांचं पॅकेज मिळतं; मुंबई विद्यापीठात 4 पैकी कुठलाही 1 कोर्स करा

    CISCE  निकाल

    CBSE प्रमाणेच CISCE सेंट्रल बोर्ड ICSE आणि ISC चे निकाल जुलैच्या मध्यापर्यंत जाहीर करेल, अशी अपेक्षा आहे. अंतिम फॉर्म्युला तसंच निकाल 15 जुलैपर्यंत जाहीर होतील, असं CISCE परिषदेने यापूर्वी सांगितलं होतं. मुख्य म्हणजे CBSE आणि CISCE ने अंतिम निकालांच्या गणनेसाठी समान सूत्र जाहीर करणं अपेक्षित आहे. CISCE यंदाच्या वर्षी बोर्डाच्या दोन परीक्षा न घेता जुन्या पद्धतीप्रमाणे एकच परीक्षा घेईल असं त्यांनी जाहीर केलं होतं. NEET अ‍ॅडमिट कार्ड 1 जुलै डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो आणि त्याच दिवशी देशातील डॉक्टर होऊ इच्छित असलेल्या मुलांना वैद्यकीय प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यासाठी आंदोलन करावं लागलं. परीक्षेच्या तारखा 30-40 दिवसांनी पुढे गेल्याने शैक्षणिक वेळापत्रकात फारसा फरक पडणार नाही, परंतु त्यांना तयारीसाठी वेळ द्यावा आणि या परीक्षेवेळी इतर प्रवेश परीक्षा येणार नाहीत याची काळजी आयोजकांनी घ्यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. दरम्यान, परीक्षा आयोजक अधिकारी या परीक्षेच्या तारखेत बदल करतील, असं दिसत नाहीये. त्यामुळे NEET 2022 परीक्षा 17 जुलै रोजी होईल आणि त्याचं अ‍ॅडमिट कार्ड 10 जुलै नंतर विद्यार्थ्यांना मिळेल अशी स्थिती आहे. तसंच जारी केले जाईल. NEET 2022 ची सिटी इंटिमेशन स्लिप आधीच आऊट झाली आहे. JEE Mains 2 जेईई मेन 2022 दोन सेशनमध्ये होणार आहे. पहिले सेशन आधीच आयोजित केले गेले असून दुसरे सेशन जुलैमध्ये होणार आहे. जेईई मेन 2022चे दुसरे सेशन 21 ते 30 जुलै दरम्यान होणार आहे. इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षेसाठी अ‍ॅडमिट कार्ड 15 जुलै नंतर दिले जाईल. तर, जेईईच्या पहिल्या सेशनचे निकाल देखील जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या सुरूवातीस जाहीर होण्याची अपेक्षा आहे. मात्र, या निकालाच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. IIM एन्ट्रन्स नोटिफिकेशन CAT 2022 नोटिफिकेशन जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध होईल. आयआयएम आणि टॉप बी स्कूल्समध्ये प्रवेशासाठी कॅट ही एक प्रवेश परीक्षा घेतली जाते. CAT 2022 ऑगस्टमध्ये होणार असून अर्जाची प्रक्रिया ऑगस्टमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. यावर्षी, आयआयएम बंगलोर (IIM Bangalore) किंवा आयआयएम लखनौ (IIM Lucknow) यापैकी एक संस्था ही परीक्षा आयोजित करेल. CUCET 43 केंद्रीय विद्यापीठं (Central Universities), 13 राज्य विद्यापीठं (State Universities), 12 डीम्ड विद्यापीठं (Deemed Universities) आणि 18 खासगी विद्यापीठे या 86 विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी पहिली-वहिली कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षा म्हणजेच CUET (Common University Entrance Test) 15, 16, 19, 20 जुलै आणि 4, 5, 6, 7, 8 आणि 10 ऑगस्ट रोजी होणार आहे. ही वर्षातील सर्वात मोठी प्रवेश परीक्षा असणार असून या साठी जवळपास 10 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. परीक्षेपूर्वी, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात CUET अ‍ॅडमिट कार्ड देण्याची शक्यता आहे. आर्मीनंतर आता इंडियन नेव्हीने दिली खूशखबर; अग्निवीरांची भरती सुरु; असा भरा अर्ज CTET केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (Central Teacher Eligibility Test) जुलैचे नोटिफिकेशन या महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात निघण्याची शक्यता आहे. अर्जाची प्रक्रिया ctet.nic.in वर प्रसिद्ध केलेल्या नोटिफिकेशननंतर सुरू होईल. सीटीईटी वर्षातून दोनदा घेतली जाते आणि त्यात दोन पेपर असतात. इयत्ता पहिली ती पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पेपर 1 मध्ये देणं आवश्यक आहे आणि इयत्ता 6 वी ते 8 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पेपर 2 देणं आवश्यक आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात