नवी दिल्ली, 04 ऑक्टोबर: सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक आदेशानंतर या सत्रापासून महिलांना नॅशनल डिफेन्स अकादमी (NDA) मध्ये सामील होण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार आता महिलांनी यासाठी अर्ज (NDA women Admissions) भारण्याशी सुरुवात केली आहे. सैन्यात महिलांना आणि पुरुषांना सामान संधी मिळावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. मात्र महिलांना NDA मध्ये सामील होण्यासाठी (Women NDA Exam form last date) अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मात्र या सर्व अडचणींना (Challenges front of Women while giving NDA exam) तोंड देण्याची ताकद महिलांकडे आहे हे नक्की.
NDA & NA exam 2021 या परीक्षेत आतापर्यंत फक्त पुरुषच बसू शकत होते. पण सर्वोच्च न्यायालयानं 2021 पासून महिलांना या परीक्षेला बसण्याची परवानगी दिली आहे. मात्र पुरुषांप्रमाणे महिलांना या परीक्षेसाठी पात्र ठरायचं असेल तर त्यानांही अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
या भरतीमध्ये उमेदवारांची निवड अनेक कडक प्रक्रिया (Selection process for NDA) केल्यानंतर केली जाते. मग उमेदवारांचं प्रशिक्षण देखील अत्यंत कठीण पद्धतीनं घेतलं जातं. अशा परिस्थितीत इतक्या कमी वेळात महिला उमेदवारांच्या वैद्यकीय फिटनेस आणि इतर मानकांबाबत नवीन नियम बनवणं हे एका आव्हानापेक्षा कमी नाही. या व्यतिरिक्त, NDA परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर उमेदवारांना त्यांना नियुक्त केलेल्या जागेवर राहण्यास जावं लागतं. अशा परिस्थितीत महिला उमेदवारांना इतक्या कमी वेळेत नवीन पायाभूत सुविधा उभारणं खूप कठीण जाऊ शकतं. त्यासाठी त्यांची नवीन आणि वेगळी व्यवस्था करणं अनिवार्य असेल.
हे वाचा - Micro Focus Recruitment: या IT कंपनीत डेव्हलपर्सच्या जागांसाठी फ्रेशर्सना संधी
एकूणच महिलांना पहिल्यांदाच NDA ची परीक्षा देऊन सैन्यात भरती होण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे महिला उमेदवार या सर्व अडचणींचा सामना करून पुढे जातील. पुरुषांपेक्षा महिला कुठेही कमी नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध करतील यात काडीमात्र शंका नाही.
यूपीएससीने 24 सप्टेंबरपासून या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया (NDA exam application process) सुरू केली होती. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर आहे. अशा परिस्थितीत महिला उमेदवारांना अर्ज करण्यासाठी फक्त 15 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. तर एनडीएमध्ये महिलांच्या भरतीची माहिती इतक्या लवकर सर्वांपर्यंत पोहोचली नाही. अशा परिस्थितीत एनडीएमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख आणखी वाढवायची का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या व्यतिरिक्त, शेवटच्या संख्येच्या जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या गेल्या आहेत याची खात्री करणे देखील आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entrance exam, NDA