नागपूर,10 नोव्हेंबर: राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर (National Health Mission, Nagpur) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Nagpur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. हृदयरोगतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, फिजिशियन/सल्लागार औषध, दंत शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, क्ष-किरण तंत्रज्ञ, कोल्ड चेन तंत्रज्ञ, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, दंत आरोग्यतज्ज्ञ, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, जनसंपर्क अधिकारी, दंतवैद्यक, शिक्षक, डॉक्टर सहाय्यक, आदिवासी सेल समन्वयक, सांख्यिकी तपासनीस, मानसशास्त्रज्ञ या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2021 असणार आहे.
या जागांसाठी भरती
हृदयरोगतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, फिजिशियन/सल्लागार औषध, दंत शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, क्ष-किरण तंत्रज्ञ, कोल्ड चेन तंत्रज्ञ, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, दंत आरोग्यतज्ज्ञ, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, जनसंपर्क अधिकारी, दंतवैद्यक, शिक्षक, डॉक्टर सहाय्यक, आदिवासी सेल समन्वयक, सांख्यिकी तपासनीस, मानसशास्त्रज्ञ.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदांनुसार पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांना संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
GCE Buldhana Recruitment: शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलढाणा इथे भरती
अर्ज पाठवण्याचा पत्ता
उमेदवारांनी नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या संबंधित रुग्णालयांमध्ये अर्ज स्वीकारल्या जाणार आहेत.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 22 नोव्हेंबर 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.nmcnagpur.gov.in/ या लिंकवर क्लिक करा
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.