नाशिक, 31 जुलै: कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक (Nashik Krushi Utpanna Bazar Samiti Recruitment) इथे लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. संगणक प्रोग्रामर, कनिष्ठ लिपिक, वायरमन, एसटीपी ऑपरेटर, पाणी पुरवठादार, चालक, प्लंबर, माळी, शिपाई आणि सफाई कामगार या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2021 असणार आहे.
या पदासाठी भरती
संगणक प्रोग्रामर (Computer Programmer)
कनिष्ठ लिपिक (Junior Clerk)
वायरम (Wiremen)
एसटीपी ऑपरेटर (STP Operator)
पाणी पुरवठादार ()
चालक (Driver & Gardener,)
प्लंबर (Plumber)
सफाई कामगार (Cleaner)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
वरील पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं शिक्षण संबंधित पदाच्या गरजेनुसार झालं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
या पत्त्यावर पाठवा अर्ज
कृषी उत्पन्न बाजार समिती,पिपंळगाव बसवंत, ता. निफाड, जि. नाशिक
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 05 ऑगस्ट 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी https://jobmaharashtra.com/wp-content/uploads/2021/07/Nashik-Krushi-Utpanna-Bazar-Samiti-48-Bharti-2021-www.jobmaharatra.com_.pdf या वेबसाईटवर जाऊ शकता.
या पदभरतीसाठी https://apmcpimpalgaon.com/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.