मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

MPSCकडून मेगा भरती जाहीर, 2023मध्ये 8 हजार 169 पदे भरणार

MPSCकडून मेगा भरती जाहीर, 2023मध्ये 8 हजार 169 पदे भरणार

mpsc exam

mpsc exam

२०२३ मध्ये आय़ोगाकडून तब्बल ८ हजार १६९ पदाच्या भरतीसाठी जाहीरात काढण्यात आली आहे. याबाबतची सविस्तर माहिती महाराष्ट्र लोकसेवा आय़ोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आलीय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Yadav

मुंबई, 20 जानेवारी : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मोठी घोषणा केली आहे. 2023 मध्ये आय़ोगाकडून तब्बल 8 हजार 169 पदाच्या भरतीसाठी जाहीरात काढण्यात आली आहे. याबाबतची सविस्तर माहिती महाराष्ट्र लोकसेवा आय़ोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आलीय. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून भरावयाच्या एकूण 8,169 पदांच्या भरतीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात(क्रमांक 01/2023) प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राजपत्रित गट ब आणि क साठी संयुक्त परीक्षा 30 एप्रिल 2023 रोजी होईल. राज्यातील 37 जिल्ह्यात केंद्रांमध्ये ही परीक्षा होणार आहे. याशिवाय अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2 सप्टेंबर 2023 रोजी आणि क गट सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 9 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे.

हेही वाचा : महिन्याचा तब्बल 2 लाखांपेक्षा जास्त पगार आणि थेट अधिकारी होण्याची संधी; करा अप्लाय

एमपीएससीकडून सर्वाधिक जागा या राज्य शासनाच्या विविध कार्यालयात लिपिक आणि टंकलेखकाच्या भरण्यात येणार आहेत. लिपिक टंकलेखनाच्या 7 हजार 34 जागा भरल्या जातील. याशिवाय वित्त विभागाच्या कर सहाय्यक पदांच्या 468 जागा असतील. तर वित्त विभाग तांत्रिक सहाय्यकाची एक जागा आहे. गृह विभागाच्या दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागात 6 पदे भरण्यात येणार आहेत. तसंच सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यांची 70 पदे आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील 8 पदाचांही यामध्ये समावेश आहे. याशिवाय वित्त विभागात राज्य कर निरीक्षकाची 159 पदे, गृह विभागाचे पोलिस उपनिरीक्षक 374 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

First published:

Tags: MPSC Examination