मुंबई, 23 एप्रिल: 30 एप्रिलला होणाऱ्या MPSC च्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि क च्या परीक्षेसंदर्भात एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. MPSC च्या हॉल तिकिट्सची लिंक हॅक करण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे हॉल तिकिट्स आणि यावरील सर्व खासगी माहिती लीक झाल्याचा संशय आहे. टेलिग्राम नावाच्या एका सोशल मीडिया अप्लिकेशनवर हे सर्व हॉल तिकिट्स अपलोड करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 30 एप्रिलला नियोजित विषयांकित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे दिनांक 21 एप्रिलला आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावर तसेच एक्सटर्नल लिंकवर उपलब्ध करुन देण्यात आली होती. यापैकी एक्सटर्नल लिंकवर उपलब्ध करुन देण्यात आलेली प्रवेशप्रमाणपत्रे एका टेलिग्राम चॅनेलवर प्रसिध्द होत असल्याची बाब आज रोजी निदर्शनास आली आहे अशी माहिती MPSC तर्फे देण्यात आली आहे.
ज्यांच्यामुळे अतिक आणि अश्रफही होते दहशतीत; UP मध्ये तब्बल 150 एन्काउंटर करणारे IPS आहेत तरी कोण?
हे हॉल तिकिट्स एक दोन नसून तब्बल 90,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे हॉल तिकिट्स अपलोड झाले आहेत आणि त्यावरील खासगी माहितीही लीक झाली असा संशय घेण्यात येत आहे मात्र MPSC कडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. सदर चॅनेलवर प्रसिध्द झालेली प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य डेटा लिक झालेला नाही, याची तज्ञांकडून खात्री करण्यात आली आहे अशी माहिती MPSC कडून देण्यात आली आहे. तसंच कोणतीही प्रश्नपत्रिका संबंधित चॅनेलवर लिक झालेली नाही याचीही खात्री MPSC कडून करण्यात आली आहे.
ज्यांच्या फक्त नावानं नक्षलवाद्यांनाही फुटतो घाम; छत्तीसगडमध्ये नक्षल्यांना सळो की पळो करून सोडणाऱ्या महिला IPS
प्रवेशप्रमाणपत्रे लिक करणाऱ्या चॅनेलच्या अँडमिनविरुध्द सायबर पोलीसांकडे तक्रार देण्यात आलेली असून प्रस्तुत प्रकरणाची सखोल चोकशी करण्यात येत आहे. तसंच पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच विषयांकित परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती MPSC कडून देण्यात आली आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे डाऊनलोड करुन घेतलेल्या प्रवेशप्रमाणपत्राच्या आधारेच उमेदवारांना परीक्षेला प्रवेश देण्यात येणार आहे इतर कोणतेही हॉल तिकीट परीक्षा केंद्रावर स्वीकारण्यात येणार नाही अशी माहिती MPSC नं दिली आहे.