जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / MPSC App: भरतीची म्हणू नका की परीक्षेची म्हणू नका; MPSC ची प्रत्येक माहिती फक्त एका क्लिक वर; भन्नाट App लाँच

MPSC App: भरतीची म्हणू नका की परीक्षेची म्हणू नका; MPSC ची प्रत्येक माहिती फक्त एका क्लिक वर; भन्नाट App लाँच

MPSC Mobile App

MPSC Mobile App

एक मोबाईल अप्लिकेशन (MPSC Android Mobile Application Launch) लाँच केली आहे. या मोबाईल अप्लिकेशनवर MPSC च्या परीक्षांबाबत, निकालांबाबत तसंच भरतीबाबत सर्व माहिती (MPSC Mobile App) मिळणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 06 जून: महाराष्ट्र लोक सेवा आयोग म्हणजेच MPSC नं टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे करत. सर्व उमेदवारांसाठी एक ऍड्रॉइड मोबाईल अप्लिकेशन (MPSC Android Mobile Application Launch) लाँच केली आहे. या मोबाईल अप्लिकेशनवर MPSC च्या परीक्षांबाबत, निकालांबाबत तसंच भरतीबाबत सर्व माहिती (MPSC Mobile App) मिळणार आहे. इतकंच नाही तर ही अप्लिकेशन अगदी सर्वांसाठी मोफत असणार आहे. दरवर्षी या परीक्षेला राज्यातील लाखो उमेदवार बसतात. अनेकांना परीक्षा दिल्यानंतर स्वतःच्या मेहनतीवर अधिकारी बनण्याची संधीही (MPSC Success story) मिळते. मात्र हे संधी मिळण्यासाठी अतोनात परिश्रम आणि मेहनत (Efforts required to crack MPSC) घ्यावी लागते. जीवाचं रान करून अभ्यास करावा लागतो. मात्र या परीक्षेसाठी फक्त शहरातीलच नाही तर अगदी राज्याच्या खेड्यापाड्यातील गरीब श्रीमंत सर्व विद्यार्थी आपली करत असतात. अशा परिस्थिती अनेकांना MPSC निकालाच्या, परीक्षेच्या किंवा भरतीच्या बातम्या कळू शकत नव्हत्या. म्हणूनच आता MPSC नं उमेदवारांसाठी मोबाईल अप्लिकेशन लाँच केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित विविध भरतीप्रक्रियांसंदर्भातील महत्वाची माहिती उमेदवारांना सुलभतेने आणि एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी; या हेतूने आयोगाच्या कार्यालयाकडून हे मोबाईल अप्लिकेशन लाँच करण्यात आली आहे. कोणाला होणार फायदा आतापर्यंत विद्यार्थ्यांना कोणतीही माहिती मिळवण्यासाठी MPSC च्या ऑफिशिअल वेबसाईटवर नजर ठेवावी लागत होती. तसंच MPSC चं ट्विटर हॅण्डल चेक करावं लागत होतं. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. तसंच खेड्यापाड्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना माहिती मिळंतपर्यंत वेळ लागत होता. संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी उपब्ध नव्हती. म्हणूनच आता या सर्व समस्यांवर उपाय म्हणून हे भन्नाट अप्लिकेशन लाँच करण्यात आली आहे.

जाहिरात

इथून अप्लिकेशन करा डाउनलोड MPSC नं ही ऑफिशिअल अप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोरची लिंक दिली आहे. https://play.google.com/store/apps/details?id=smbgroup.coin.mpsc या लिंकवरून उमेदवार ही लिंक आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात