लखनऊ, 5 मार्च : उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथील उमेश पाल हत्याकांडातील सात गुन्हेगारांपैकी एकाचे एन्काउंटर उत्तर प्रदेश पोलिसांनी केले आहे. यूपीचे एडीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी या एन्काउंटरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रशांत कुमार हे 1990 च्या यूपी केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते यूपी पोलिसात ADG कायदा आणि सुव्यवस्था म्हणून सेवेत आहे. प्रशांत हे मूळचा बिहारचे आहेत. डिसेंबर 2022च्या मध्यापासून, राज्याचे सर्व पोलीस आयुक्त ADG L&O IPS प्रशांत कुमार यांना अहवाल देतात. डीजीपी डीएस चौहान यांनी हा आदेश जारी केला आहे. एडीजी प्रशांत कुमार हे मुख्यमंत्री योगी यांचे अत्यंत विश्वासू अधिकारी मानले जातात. हल्लेखोरांना अटक करण्यासाठी - प्रशांत कुमार यांना शौर्यासाठी 3 वेळा पोलीस पदक मिळाले आहे. त्यांना 2020, 2021 मध्ये शौर्य पुरस्कार मिळाला. राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यासाठी पोलीस पदकही मिळाले आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांनावर नियंत्रण आणण्यासाठी यूपी सरकारने प्रशांत कुमार यांची एडीजी म्हणून नियुक्ती केली आहे. Success Story : एकेकाळी नैराश्यामुळे नोकरी सोडली, आता लाखो चेहऱ्यांवर आणते हास्य 300 पेक्षा जास्त एन्काउंटर - मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रशांत कुमारने 300 हून अधिक एन्काउंटर केले आहेत. 1990 मध्ये आयपीएस झाल्यापासून त्यांनी 300 हून अधिक वेळा गुन्हेगारांविरोधात लढा दिला आहे. खूंखार संजीव जीवा, कग्गा, मुकीम काला, सुशील मूंछ, अनिल दुजाना, सुंदर भाटी, विक्की त्यागी, साबिर गैंग यापैकी आता क्वतिच कोणती टोळी शिल्लक राहिली असेल. .
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







