जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / तब्बल 48,000 रुपये पगार आणि थेट 'या' मंत्रालयात नोकरीची संधी; दिलेल्या पत्त्यावर लगेच पाठवा अर्ज

तब्बल 48,000 रुपये पगार आणि थेट 'या' मंत्रालयात नोकरीची संधी; दिलेल्या पत्त्यावर लगेच पाठवा अर्ज

सरकारी नोकरी

सरकारी नोकरी

परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलं असून, त्यात पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, नियुक्ती झाल्यानंतर देण्यात येणारं वेतन आदींबाबत सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11, जून: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना सुवर्णसंधी आहे. परराष्ट्र मंत्रालयात कन्सल्टंट अर्थात सल्लागार पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. उच्चशिक्षित व अनुभवी उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 21 जून 2023 पर्यंत आहे. नियुक्ती एक वर्षाकरिता असेल. या भरती प्रक्रियेबाबत परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलं असून, त्यात पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, नियुक्ती झाल्यानंतर देण्यात येणारं वेतन आदींबाबत सविस्तर तपशील देण्यात आला आहे. याबाबतचं वृत्त `स्टडी कॅफे डॉट कॉम`ने दिलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या नोटिफिकेशननुसार, सल्लागार या पदासाठी अर्जदाराची नियुक्ती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या नवी दिल्लीतल्या मुख्यालयात करण्यात येईल. केवळ एका पदासाठी ही भरती केली जाणार आहे. अर्ज केलेल्या इच्छुक व पात्र उमेदवारांमधून निवडलेल्या अर्जदाराची नियुक्ती केल्यानंतर त्याला 48 हजार रुपये मासिक मानधन मिळेल. दरम्यान, हे रिक्त पद एक वर्ष मुदतीकरिता भरलं जाणार असलं, तरी या पदाचा कालावधी नियुक्त झालेल्या उमेदवाराच्या परफॉर्मन्सनुसार वाढवला जाऊ शकतो. 10वी पास उमेदवारांसाठी थेट इंडियन आर्मीमध्ये नोकरी; या दिवशी सुरु होणार अर्ज वयोमर्यादा व पात्रता काय? परराष्ट्र मंत्रालयाच्या नोटिफिकेशनुसार, सल्लागार पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा 30 ते 45 वर्षांच्या दरम्यान असावी. अर्जदार भारतीय नागरिक असावा. उमेदवाराने किमान पदवीपर्यंत शिक्षण घेतलेलं असावं. अर्जदाराकडे आयकर आणि जीएसटी संबंधित कामाच्या क्षेत्रातला किमान पाच वर्षांचा अनुभव असावा. केंद्र सरकारच्या मंत्रालयात अशाच नोकरीचा अनुभव असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिलं जाईल. उमेदवार हा इंग्रजी आणि हिंदीमध्ये पारंगत असावा. उमेदवाराला एमएस ऑफिसचं ज्ञान असावं. उच्चशिक्षित तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी; `या` पदासाठी भरती प्रक्रिया सुरू असा करा अर्ज परराष्ट्र मंत्रालयात सल्लागार पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये दिलेला अर्ज सर्व माहितीसह अंडर सेक्रेटरी (पीएफ अँड पीजी), परराष्ट्र मंत्रालय, कक्ष क्र. 4071, जवाहरलाल नेहरू भवन, 23-डी जनपथ, नवी दिल्ली -110011 या पत्त्यावर पाठवावा. उमेदवाराने अर्जासोबत त्याची शैक्षणिक प्रमाणपत्रं आणि कामाच्या अनुभवासंदर्भातल्या प्रमाणपत्रांच्या प्रती पाठवाव्यात. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 21 जून 2023 आहे. UPSC NDA परीक्षा देण्याचा विचार करताय? मग इथे मिळेल संपूर्ण सिलॅबस दरम्यान, सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची एक चांगली संधी आहे. परंतु या पदासाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाचं अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात