मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

...अन्यथा पुन्हा सर्व शाळा होतील बंद; Omicron च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिक्षण मंत्र्यांनी दिला इशारा

...अन्यथा पुन्हा सर्व शाळा होतील बंद; Omicron च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिक्षण मंत्र्यांनी दिला इशारा

 काय म्हणाल्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड वाचा

काय म्हणाल्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड वाचा

अशीच काही परिस्थिती पुढील काही काळात राहिली तर नाईलाजानं शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल असं वर्षा गायकवाड यांनी म्हंटलं आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई,  22 डिसेंबर: देशात कोरोनाचा प्रदुर्भाव गेल्या दीड वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरु आहे. त्यामुळे शाळा आणि कॉलेजेस (School and colleges) बंद करण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या (Online education) माध्यमातून शिक्षण दिलं जात होतं. मात्र गेल्या काही महिन्यांमधील कोरोनाची समाधानकारक स्थिती बघता हळूहळू शाळा आणि कॉलेजेस सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शाळा कॉलेजेस सुरु झाले होते. मात्र आता कोरोनच्या नव्या व्हेरिएन्टनं परत चिंता वाढवली आहे. जर Omicron असाच राज्यात (Omicron patients in Maharashtra) वाढत राहिला तर सुरु करण्यात आलेल्या शाळा पुन्हा बंद (Closing of schools in Maharashtra) कराव्या लागतील असा इशारा शालेय शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांनी दिला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना यासंबंधीची माहिती दिली आहे. राज्यात दिवसेंदिवस Omicron चा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. बघता बघता देशभरातील सर्व राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्ण अधिक वाढत आहेत. अशीच काही परिस्थिती पुढील काही काळात राहिली तर नाईलाजानं शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल असं वर्षा गायकवाड यांनी म्हंटलं आहे. SSC HSC Exams 2022: 10वी,12वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, पाहा संपूर्ण Timetable ''दरम्यान राज्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. अशाच पद्धतीनं Omicron चा प्रदरभाव राहिला तर सरकार शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतं" असंही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या. दरम्यान काल  आरोग्य विभागाने राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबद्दल माहिती प्रसिद्ध केली आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी काल 11 रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी 8 रुग्ण मुंबई विमानतळावरील तपासणीतील तर प्रत्येकी 1 रुग्ण पिंपरी चिंचवड, उस्मानाबाद आणि नवी मुंबई येथे आढळला आहे. त्यामुळे आता राज्यातील Omicron कोरोना बाधीतांची संख्या एकूण 65 झाली आहे. आतापर्यंत 34 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली असता 34 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आढळून आले. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर देशभरात Omicron चे एकूण  214 रुग्ण आहेत. देशभरातील राज्यांपैकी महाराष्ट्र आणि दिल्लीत सर्वाधिक रिऊग्न आढळले आहेत. महाराष्ट्रात 65 तर दिल्लीत 57 Omicron चे रुग्ण आहेत.
First published:

Tags: Corona, Maharashtra, Schools closed, Varsha gaikwad

पुढील बातम्या