मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Bill Gates यांचा रिझ्युमे सोशल मीडियावर व्हायरल, नोकरीसाठी केलाय `या` गोष्टींचा उल्लेख

Bill Gates यांचा रिझ्युमे सोशल मीडियावर व्हायरल, नोकरीसाठी केलाय `या` गोष्टींचा उल्लेख

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स (Bill Gates) यांनी त्यांचा 48 वर्षांपूर्वीचा रिझ्युमे शेअर केला आहे. बिल गेट्स तेव्हा हार्वर्ड विद्यापीठात प्रथम वर्षाचे विद्यार्थी होते. 1974 च्या बायोडाटामध्ये त्यांचे नाव विल्यम एच. गेट्स असे लिहिले आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स (Bill Gates) यांनी त्यांचा 48 वर्षांपूर्वीचा रिझ्युमे शेअर केला आहे. बिल गेट्स तेव्हा हार्वर्ड विद्यापीठात प्रथम वर्षाचे विद्यार्थी होते. 1974 च्या बायोडाटामध्ये त्यांचे नाव विल्यम एच. गेट्स असे लिहिले आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स (Bill Gates) यांनी त्यांचा 48 वर्षांपूर्वीचा रिझ्युमे शेअर केला आहे. बिल गेट्स तेव्हा हार्वर्ड विद्यापीठात प्रथम वर्षाचे विद्यार्थी होते. 1974 च्या बायोडाटामध्ये त्यांचे नाव विल्यम एच. गेट्स असे लिहिले आहे.

पुढे वाचा ...

  न्यूयॉर्क, 2 जुलै : शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रत्येक तरुण योग्य आणि चांगल्या नोकरीच्या (Jobs) शोधात असतो. गेल्या काही वर्षांत नोकरीच्या संधी कमी झाल्यानं बेरोजगारीचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे सध्याच्या काळात नोकरी मिळवण्यासाठी तरुणांना खूप परिश्रम घ्यावे लागतात. नोकरी मिळवण्यासाठी तुमच्याकडं संबंधित विषयाचं कौशल्य असणं आवश्यक असतं. परंतु, कौशल्यासह बाकी अनेक गोष्टी ज्यामध्ये नमूद केलेल्या असतात, तो रिझ्युमे अर्थात बायोडाटा जर आकर्षक असेल तर नोकरी मिळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे रिझ्युमे (Resume) आकर्षक करण्याकडे तरुणांचा कल असतो. सध्या जगातल्या सर्वांत श्रीमंत आणि यशस्वी व्यक्तीचा रिझ्युमे सोशल मीडियावर (Social Media) जोरदार व्हायरल होत आहे. हा रिझ्युमे सुमारे 48 वर्षांपूर्वीचा आहे. हा रिझ्युमे चक्क मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांचा असून, तो त्यांनी स्वतः शेअर केला आहे. या रिझ्युमेमधल्या अनेक गोष्टींची नेटिझन्समध्ये चर्चा आहे. `आज तक`ने या विषयीची माहिती दिली आहे.

  विल्यम हेन्री गेट्स यांना जग बिल गेट्स या नावानं ओळखतं. जगातल्या सर्वांत श्रीमंत उद्योगपतींपैकी (Richest Businessman) एक असलेले बिल गेट्स सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. बिल गेट्स यांनी त्यांचा 48 वर्षांपूर्वीचा रिझ्युमे शेअर केला आहे. बिल गेट्स यांचा करिअर ग्राफ खूप मोठा आहे. 1975 मध्ये बिल गेट्स आणि पॉल एलन यांनी मिळून मायक्रोसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीची (Microsoft) स्थापना केली. जगातल्या टॉप-5 श्रीमंत व्यक्तींच्या यादीत बिल गेट्स यांचा समावेश आहे. प्रदीर्घ काळापासून ते सर्वांत श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जात आहे. त्यांची एकूण संपत्ती सुमारे 124.9 अब्ज डॉलर इतकी आहे. बिल गेट्स यांनी 2000 मध्ये सीईओपदाचा राजीनामा दिला होता. गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी त्यांनी बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनची स्थापना केली. 2008 मध्ये त्यांनी मायक्रोसॉफ्टमधलं काम सोडलं. परंतु, मार्च 2020 पर्यंत ते कंपनीच्या संचालक मंडळाचे सदस्य होते.

  स्टार्टअप सुरु करायचंय पण भांडवल नाहीये? चिंता नको; पुणे विद्यापीठ देईल सीड फंड

  बिल गेट्स यांची कारकीर्द मोठी आहे. पण सध्या स्वतःचा जुना रिझ्युमे सोशल मीडियावर शेअर केल्याने ते जोरदार चर्चेत आहेत. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी त्यांचा रिझ्युमे शेअर करताना लिहिलं आहे की, ``आजच्या तरुणांचा रिझ्युमे माझ्या जुन्या रिझ्युमेपेक्षा खूप चांगला असेल याची मला खात्री आहे.`` हा रिझ्युमे जेव्हा तयार केला तेव्हा बिल गेट्स हार्वर्ड युनिव्हर्सिटीत (Harvard University) पहिल्या वर्षात शिकत होते. 1974 च्या या रिझ्युमेमध्ये त्यांचं नाव विल्यम एच. गेट्स असं लिहिलं आहे. त्यात त्यांनी कामाचा अनुभव नमूद केला आहे. रिझ्युमेमधल्या माहितीनुसार, त्यांनी ऑपरेटिंग सिस्टम स्ट्रक्चर, डेटाबेस मॅनेजमेंट, कंपाइलर कन्स्ट्रक्शन आणि कम्प्युटर ग्राफिक्ससारखे कोर्स केले होते. 1973 मध्ये टीआरडब्ल्यू सिस्टिम्स ग्रुपसोबत सिस्टिम प्रोग्रामर म्हणून काम करण्याचा अनुभव त्यांनी रिझ्युमेमध्ये नमूद केला आहे. FORTRAN, COBAL, ALGOL, BASIC सारख्या प्रमुख प्रोग्रॅमिंग लँग्वेजच्या (Programming Languages) अनुभवाचा उल्लेख त्यांनी रिझ्युमेमध्ये केला आहे.

  ``तुम्ही नुकतेच पदवीधर झाला असाल किंवा कॉलेजमधून बाहेर पडलेले असाल, मला खात्री आहे की तुमचा रिझ्युमे माझ्या 48 वर्षांपूर्वीच्या रिझ्युमेपेक्षा खूपच चांगला दिसेल,`` असं बिल गेट्स यांनी रिझ्युमे शेअर करताना लिहिलं आहे. सध्या या अनोख्या रिझ्युमेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

  First published:
  top videos

   Tags: Bill gates