Home /News /career /

विद्यार्थ्यांनो, MHT CET 2022 साठी अजूनही करू शकता रजिस्ट्रेशन; नोंदणीची तारीख ढकलली पुढे

विद्यार्थ्यांनो, MHT CET 2022 साठी अजूनही करू शकता रजिस्ट्रेशन; नोंदणीची तारीख ढकलली पुढे

नोंदणीची तारीख पुढे ढकलली

नोंदणीची तारीख पुढे ढकलली

MHT CET 2022 देऊ इच्छिणारे विद्यार्थी आता 11 मे 2022 च्या मध्यरात्री पर्यंत MHT-CET परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात.

  मुंबई, 04 मे: महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा MHT CET 2022 ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती काही दिवसांपूर्वी उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) आहे ट्विट करून दिली होती. काही विद्यार्थ्यांनी MHT CET Exam 2022 पुढे ढकलण्याची (MHT CET 2022 exam postponed) मागणी केली होती. त्यानुसार उच्च आणि तंत्रशिक्षण मंडळाकडून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती आणि या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. आता याच परीक्षेसंदर्भात एक दिलासादायक बातमी समोर येतेय. MHT CET 2022 देऊ इच्छिणारे विद्यार्थी आता 11 मे 2022 च्या मध्यरात्री पर्यंत MHT-CET परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात. हजारो विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. MHT CET 2022, साठी 11 मे 2022 च्या मध्यरात्री पर्यंत विद्यार्थी या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करू शकणार आहेत. 12वी नंतर NDA Entrance देणार आहात? मग इथे मिळेल परीक्षेविषयीची संपूर्ण माहिती
  काही विद्यार्थ्यांनी MHT CET Exam 2022 पुढे ढकलण्याची (MHT CET 2022 Registration Process postponed) मागणी केली होती. त्यानुसार उच्च आणि तंत्रशिक्षण मंडळाकडून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती आणि या परीक्षेचं वेळापत्रक लवकरच जहीर करण्यात येईल असं सांगितलं होतं. त्यानुसार आता या परीक्षेचं वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. या असतील परीक्षेच्या तारखा
  MHT CET Exam 2022 साठी PCM ग्रुपची परीक्षा येणाऱ्या 05 ते 11 ऑगस्ट, 2022 या दरम्यान घेण्यात येणार आहे. तर PCB ग्रुपची परीक्षा ही 12 ते 20 ऑगस्ट, 2022 दरम्यान होणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे 15, 16 व 17 ऑगस्ट या तारखांना कोणतेही पेपर नसणार आहेत. दरम्यान JEE , NEET आणि MHT CET या परीक्षांच्या तारखांमध्ये ओव्हरलॅपिंग होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांकडून ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे ही परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Entrance Exams, Exam Fever 2022, Maharashtra News

  पुढील बातम्या