जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / MH BOARD SSC RESULT: निकाल नीट तपासून घेतलाय ना? अनेक निकालांमध्ये आढळताहेत त्रुटी; लगेच करा चेक

MH BOARD SSC RESULT: निकाल नीट तपासून घेतलाय ना? अनेक निकालांमध्ये आढळताहेत त्रुटी; लगेच करा चेक

MH BOARD SSC RESULT: निकाल नीट तपासून घेतलाय ना? अनेक निकालांमध्ये आढळताहेत त्रुटी; लगेच करा चेक

MH BOARD SSC RESULT: विद्यार्थ्यांच्या निकालात त्रुटी येत आहेत. म्हणून तुम्हाला मिळालेल्या मार्कांची बेरीज करून घेणं आवश्यक आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 जून: गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला विषय म्हणजे दहावी आणि बारावी स्टेट बोर्डाचे निकाल. अखेर आज म्हणजेच 17 जूनला 2022 ला स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल (Maharashtra state board 10th Result 2022) जाहीर झाला आहे. यंदा तब्बल दोन वर्षांनी ऑफलाईन परीक्षा झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या पालकांनाही प्रचंड टेन्शन आलं आहे. आज दुपारी एक वाजता हा निकाल तुम्ही ऑनलाईन जाहीर झाला आहे.

दरवर्षी महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावी आणि बारावीच्या बोर्डाचा निकाल हा जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात (Maharashtra State Board 10th Result 2022) जाहीर होतो. त्याप्रमाणे बारावीचा निकाल हा काल जाहीर करण्यात आला. मात्र यानंतर आता दहावीचा निकाल लवकरच लागणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल हा येत्या 15 जूनपर्यंत जाहीर (Maharashtra State Board 10th Result 2022) होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निकालाचं प्रिंट घ्या निकाल हा ऑनलाईन पद्धतीनं जरी इंटरनेटवर दिसत असला तरीही मी,रस चेक केल्यानंतर निकालाच्या दोन ते तीन प्रिंट्स घेऊन ठेवणं आवश्यक आहे. शाळेतून किंवा कॉलेजमधून निकालाची ओरिजनल प्रिंट मिळण्यासाठी अनेक दिवस लागतात. मात्र तेवढ्यात अकरावी आणि इतर प्रवेश सुरु होत आहेत. म्हणूनच निकालाची प्रिंट घेऊन ठेवणं आवश्यक आहे. MH BOARD SSC RESULT: निकाल तर लागला! पण आता पुढे काय? ‘हे’ आहेत 10वी नंतरचे बेस्ट करिअर ऑप्शन्स सर्व माहिती तपासा निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन निकाल बघताना तुमचा रोल नंबर, आईचं नाव, वडिलांचं नाव, तुमचं नाव, तसंच सर्व गुणांची बेरीज आणि टक्केवारी एकदा नक्की तपासून घ्या. तसंच तुमच्या आणि वडिलांच्या पूर्ण नावाचं स्पेलिंगही तपासून घ्या. जेणेकरून तुम्हाला कुठेही प्रवेश घेण्यात अडचण होणार नाही. तुमचे गुण आणि गुणांची बेरीज करा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तुमच्या गुणांची संपूर्ण बेरीज करा. अनेक विद्यार्थ्यांच्या निकालात त्रुटी येत आहेत. म्हणून तुम्हाला मिळालेल्या मार्कांची बेरीज करून घेणं आवश्यक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात