जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / रस्त्यावर पुस्तक विक्री ते आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात स्टॉल; लेखक मुकुल कुंद्राचा प्रवास, व्हिडिओ चर्चेत

रस्त्यावर पुस्तक विक्री ते आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात स्टॉल; लेखक मुकुल कुंद्राचा प्रवास, व्हिडिओ चर्चेत

रस्त्यावर पुस्तक विक्री ते आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात स्टॉल; लेखक मुकुल कुंद्राचा प्रवास, व्हिडिओ चर्चेत

कुंद्रा यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला ते रस्त्यावर पुस्तक विकताना दिसतात. तर, या व्हिडिओचा शेवट हा दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात त्यांना एक लेखक म्हणून ज्या सन्मानानं वागणूक मिळते, ते दाखवताना होतोय.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई 13 एप्रिल : एखाद्या क्षेत्रात यशस्वी होणं सहजासहजी शक्य नसतं. यशस्वी व्यक्तीच्या प्रवासात अनेक आव्हानं येत असतात, त्याला खूप संघर्ष करावा लागतो. तरुण लेखक मुकुल कुंद्रा यांचा प्रवाससुद्धा असाच संघर्षमय आहे. रस्त्यावर पुस्तकं विकण्यापासून सुरू झालेला कुंद्रा यांचा प्रवास आता एक लेखक म्हणून थेट दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात स्वतःच्या पुस्तकांचा स्टॉल लावण्यापर्यंत पोहोचला आहे. याबाबतचा व्हिडिओ कुंद्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने याबाबत वृत्त दिलंय. ‘यश हे अपघात नाही. ते कठोर परिश्रम, चिकाटी, जिद्द, अभ्यास, त्याग आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे करत आहात किंवा शिकत आहात त्याबद्दल असणार प्रेम आहे.’ जगप्रसिद्ध फुटबॉलपटू पेलेच्या या शब्दांचं उत्तम उदाहरण म्हणजे इन्स्टाग्रामवर लेखक मुकुल कुंद्रा यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये त्यांना एक लेखक म्हणून कसा संघर्ष करावा लागला, याची एक झलक दाखवण्यात आलीय. कमी वयात नोकरी मिळवण्यासाठी करा ‘हा’ कोर्स, पाहा कशी आहे प्रवेश प्रक्रिया Video कुंद्रा यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला ते रस्त्यावर पुस्तक विकताना दिसतात. तर, या व्हिडिओचा शेवट हा दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात त्यांना एक लेखक म्हणून ज्या सन्मानानं वागणूक मिळते, ते दाखवताना होतोय. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘एक दिवस मी ते मिळवेनच. हा प्रवास आजपर्यंतचा रोलर कोस्टर आहे, आणि ही फक्त एक सुरुवात आहे. ‘कीप हसलिंग..यू विल मेक इट’ या माझ्या मंत्रावर मी कायम आहे.’

    जाहिरात

    युजर्सनी केलं कौतुक कुंद्रा यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओंवर कमेंट्सचा पाऊस पडतोय. अनेकांनी त्यांचं कौतुक केलंय. एका युजरनं कमेंट केली की, ‘तुम्हाला अधिक सामर्थ्य मिळो. एक पुस्तकप्रेमी असल्यानं मला लवकरच तुम्हाला भेटायचं आहे.’ तर, एका युजरनं लिहिलं आहे की, ‘व्वा हे खूप छान आहे!’ आणखी एका युजरनं कमेंट केली आहे की, ‘हा एक आश्चर्यकारक प्रवास आहे.’ तर,‘मी तुम्हाला ओळखत नाही, तुमच्या संघर्षाबद्दलही मला माहिती नाही. पण तुमच्या पूर्ण प्रयत्नांसाठी आणि ‘सोडणार नाही’ या निर्धारासाठी, मी तुमचा आदर करतो. शिकण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी मी तुमचं अनुकरण करेन,’ अशी कमेंटसुद्धा एका युजरनं दिली आहे. तर, एका युजरनं ‘खूप प्रेरणादायी प्रवास,’ अशी कमेंट करून कुंद्रा यांचे कौतुक केलंय. ‘ते’ नुसते दिसले तरी थरथर कापतात गुन्हेगार; आतापर्यंत तब्बल 60 एन्काऊंटर केलेले IPS आहेत तरी कोण? दरम्यान, हा व्हिडिओ काही महिन्यांपूर्वी पोस्ट करण्यात आला होता. व्हिडिओला आतापर्यंत 6.8 लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले असून, जवळपास 1.1 लाख लाईक्स मिळालेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ असल्याची चर्चाही सोशल मीडियावर सुरू आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात