जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Success Story : मुलाच्या मृत्यूने खचला पण हिंमत एकवटली, कारखाना उघडून आज इतक्या लोकांना देतोय रोजगार

Success Story : मुलाच्या मृत्यूने खचला पण हिंमत एकवटली, कारखाना उघडून आज इतक्या लोकांना देतोय रोजगार

सक्सेस स्टोरी

सक्सेस स्टोरी

मड मॅजिक फॅक्टरीची सुरुवात ही संघर्षाने झाली.

  • -MIN READ Local18 Bokaro,Jharkhand
  • Last Updated :

कैलाश कुमार, प्रतिनिधी बोकारो, 15 जून : झारखंड राज्यातील बोकारोच्या सेक्टर 2 मधील अरुण सिंग हे सर्वांसाठी एक प्रेरणदायी उदाहरण आहे. त्यांनी वाईट परिस्थितीतून सावरल्यानंतर स्वतःला उभे केले. आयुष्यातील अनेक अडचणींचा ते मोठ्या धैर्याने सामोरे गेले. त्यांनी कठीण परिस्थिती असतानाही हार मानली नाही. अगदी आपल्या तरुण मुलाच्या मृत्यू झाला. त्या दु:खातही त्यांनी धैर्य ठेवले आणि आज अरुण सिंग आज कुल्हड तयार करण्याचा कारखाना चालवत आहेत. तसेच या माध्यमातून ते 17 जणांना रोजगारही देत आहेत. बोकारोच्या चास गटातील सियारदा येथे असलेल्या मड मॅजिक कारखान्यात दररोज 25000 मातीचे कुल्हड आणि ग्लास तयार केले जातात. तसेच बोकारो आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये त्याचा पुरवठा केला जातो.

News18लोकमत
News18लोकमत

न्यूज 18 शी बोलताना अरुण म्हणाले की, मड मॅजिक फॅक्टरीची सुरुवात ही संघर्षाने झाली. 2022 मध्ये त्यांचा मोठा मुलगा उत्कर्ष याचा एका रस्ता अपघातात मृत्यू झाला. यानंतर ते आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या खचले होते. त्यांच्यावर अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या होत्या. यानंतर त्यांनी हिंमत एकवटून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि कुल्हड कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला. नियती आणि माझ्या मेहनतीचा परिणाम असा की, माझा कारखाना चांगल्या प्रकारे सुरू झाला.

कुल्हड बनवण्याच्या प्रक्रियेबाबत अरुण म्हणाले की, मजबूत कुल्हड बनवण्यासाठी चीटा आणि पिवळी माती वापरली जाते. सर्वप्रथम ग्राइंडर मशीनच्या साहाय्याने माती बारीक केली जाते. मग मातीवर पाणी ओतले जाते आणि ते फुलवली जाते. पगमेल मशीनच्या साहाय्याने चिकणमाती मळून मातीच्या स्वरूपात तयार केली जाते. जिगर मशिनच्या साहाय्याने 60 मिली आणि 200 मिली खांचे तयार केले जातात. कुल्हड सुकल्यानंतर ओल्या कापडाच्या साहाय्याने ते गुळगुळीत केले जाते. मग ते 24 तास भट्टीत सोडले जाते. अशा प्रकारे भाजल्यानंतर तयार केलेले कुल्लड बाजारात विक्रीसाठी पाठवले जाते. हा कारखाना तयार करण्यासाठी सुमारे 25 लाख रुपये खर्च झाल्याचे अरुण यांनी सांगितले. बोकारोला पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिक आणि थर्माकोलच्या कपांपासून मुक्त करणे हा त्यांचा उद्देश आहे, असेही त्यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात