जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / नशीब काढलं पठ्ठयानं! छप्पर फाडके लॉटरी; एकाच दिवशी मिळाली नोकरी आणि छोकरी

नशीब काढलं पठ्ठयानं! छप्पर फाडके लॉटरी; एकाच दिवशी मिळाली नोकरी आणि छोकरी

एकाच दिवशी मिळाली नोकरी आणि छोकरी

एकाच दिवशी मिळाली नोकरी आणि छोकरी

अनुज कुमार असं या तरुणाचं नाव आहे. नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर अनुजच्या आनंदाला पारावार राहिलेला नाही

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मेरठ, 27 फेब्रुवारी : ‘उपरवाला जब भी देता है, तो छप्पर फाड़ के देता है’ अशी हिंदी म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. ‘देव जेव्हा देतो तेव्हा भरभरून देतो’ अशा आशयाची ही म्हण प्रसिद्ध आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठचा रहिवासी असलेल्या तरुणाच्या बाबतीत असाच काहीसा प्रकार घडला आहे. या तरुणाला एकाच दिवशी नोकरी आणि बायको दोन्हीही मिळालं आहे. रविवारी लग्नाच्या दिवशीच या तरुणाला पोलीस उपनिरीक्षक पदाचं नियुक्तीपत्र मिळालं आहे. अनुज कुमार असं या तरुणाचं नाव आहे. नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर अनुजच्या आनंदाला पारावार राहिलेला नाही. तो म्हणतो की, पोलीस उपनिरीक्षकाची नोकरी आणि लग्न एकाच दिवशी होत असल्याच्या आनंदासारखा दुसरा आनंद नाही.   मुलांनी परीक्षेत टॉप करावं असं वाटतं ना? मग पालकांनो ‘या’ चुका कधीच करू नका अनुज कुमार म्हणाला, ‘आपल्या आयुष्यात असे काही क्षण असतात जे आपण कधीही विसरू शकत नाही. मीदेखील 26 फेब्रुवारीचा दिवस कधीच विसरणार नाही. याला तुम्ही ‘लेडी लक’ही म्हणू शकता. प्रत्येक पुरुषाच्या यशात स्त्रीचा हात असतो.’ अनुजनंदेखील आपल्या यशाचं श्रेय पत्नीला दिलं आहे. अनुजच्या मते, त्याची पत्नी त्याच्यासाठी लक्ष्मीच्या रुपात आली आहे. Google Digital Marketing: ‘हे’ टॉप डिजिटल मार्केटिंग कोर्सेस करा आणि लाखोंमध्ये कमवा पैसे; बघा लिस्ट हापूर येथील रहिवासी असलेल्या अनुज कुमारच्या घरी रविवारी डीजेच्या तालावर नाचून लग्नाचा आनंद साजरा केला गेला. लग्नासाठी वधूच्या घरी गेलेला अनुज नियुक्तीपत्र मिळाल्यावर लवकर घरी जाण्यासाठी उत्सुक दिसत होता. अनुजच्या कुटुंबीयांनाही त्याला नोकरी मिळाल्याचा आनंद झाला आहे. नोकरी आणि लग्न एकाच दिवशी होणं हा दुर्मिळ योगायोग असल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. एडीजी राजीव सभरवाल, मेरठ रेंजचे आयजी प्रवीण कुमार, मेरठचे एसएसपी रोहित सिंग सजवान आणि सर्व उच्च अधिकाऱ्यांनी अनुजचं आणि नियुक्तीपत्र मिळालेल्या इतर तरुणांचं अभिनंदन केलं आहे. अनुजला अधिकाऱ्यांनी लग्न झाल्याबद्दलही शुभेच्छा दिल्या आहेत. Maharashtra Talathi Bharti: नक्की कधीपासून सुरु होणार तलाठी अर्ज प्रक्रिया; महसूल मंत्र्यांनी सांगितली तारीख शनिवारी मेरठ येथील पोलीस लाइन्स येथील परेड ग्राउंडवर सिव्हिल उपनिरीक्षक, पोलीस प्लाटून कमांडर पीएसी आणि सेकंड फायर ऑफिसर पदासाठी एकूण 786 उमेदवारांना नियुक्तीपत्रं देण्यात आली. नवनियुक्त उमेदवारांना पोलीस खात्यात रुजू होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. मेरठ झोनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक, वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांनी तरुणांना नियुक्तीपत्र दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही सर्व नवनियुक्त अधिकाऱ्यांचं व्हर्च्युअल माध्यमातून अभिनंदन केलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात