मुंबई, 16 जून : कोरोना महामारीच्या अडथळ्यामुळे राज्यातील शाळा कॉलेजेस गेल्या दोन वर्षांपासून बंद होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यात आला. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांचा निकाल विशेष मुल्यांकन पद्धतीनं लावण्यात आला. यंदा बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं (Offline Board Exams) घेण्यात आल्या. त्यानंतर बारावीचा निकाल 8 जून रोजी लागला. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याची सर्वांना उत्सुकता होती. ती उत्सुकता आता संपली असून दहावीचा निकाल उद्या म्हणजेच शुक्रवारी 17 जून रोजी लागणार आहे. दहावीचा निकाल हा तुम्हाला अगदी घरबसल्या आरामात पाहाता येणार आहे. हा निकाल पाहण्याची काय करावे लागेल ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. दहावीच्या निकालाच्या (Result MH HSC result) दिवशी अशी अडचण विद्यार्थ्यांना येणार नाही असा प्रयत्न राज्य सरकारचा असणार आहे. विशेष म्हणजे हा निकाल तुम्ही हा निकाल News 18 लोकमतच्या ऑफिशिअल वेबसाईटवर थेट बघू शकणार आहात. त्यामुळे निकालाच्या वेबसाईटच सर्व्हर डाऊन असेल तरी तुम्हाला तुमचा निकाल बघता येणार आहे. यासाठी तुम्हाला आधी वेबसाईटवर रजिस्टर करावं लागणार आहे.
अशा पद्धतीनं करा रजिस्ट्रेशन यासाठी आधी https://lokmat.news18.com/career/ हा लिंकवर जा. यानंतर बोर्डाच्या निकालाची कोणतीही बातमी उघडा. यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी विंडो दिसेल. इथे तुमचा क्लास म्हणजे दहावी सिलेक्ट करा. यानंतर तुमचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी भर. यानंतर Register या बटनेवर क्लिक करा. अशा पद्धतीनं नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल बघता येईल. SSC Result : दहावीच्या निकालाची तारीख निश्चित, पाहा कधी आणि कुठे पाहणार निकाल? कुठे बघता येईल निकाल महाराष्ट्र बोर्डाचा 10वीचा निकाल 2021 News18.com वर पाहता येईल. तुम्ही MSBSHSE च्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला देखील भेट देऊ शकता. lokmat.news18.com वर देखील तुम्ही हे निकाला लाईव्ह पाहू शकता.