Home /News /career /

MH BOARD SSC RESULT: अपेक्षेनुसार मार्क्स मिळाले नाहीत तरी चिंता करू नका; रिचेकिंगची अशी असेल प्रोसेस

MH BOARD SSC RESULT: अपेक्षेनुसार मार्क्स मिळाले नाहीत तरी चिंता करू नका; रिचेकिंगची अशी असेल प्रोसेस

अशी असेल रिचेकिंग प्रोसेस

अशी असेल रिचेकिंग प्रोसेस

तुम्हाला काहीही त्रुटी आढळल्या किंवा मनासारखे मार्क्स मिळाले मिळाले नाहीत तर चिंता करू नका. तुम्ही तुमचे पेपर्स रिचेकिंगला देऊ शकता.

  मुंबई, 17 जून: गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला विषय म्हणजे दहावी आणि बारावी स्टेट बोर्डाचे निकाल. अखेर आज म्हणजेच 17 जूनला 2022 ला स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल (Maharashtra state board 10th Result 2022) जाहीर झाला आहे. यंदा तब्बल दोन वर्षांनी ऑफलाईन परीक्षा झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या पालकांनाही प्रचंड टेन्शन आलं आहे.आज दुपारी एक वाजता हा निकाल तुम्ही ऑनलाईन जाहीर झाला आहे. पण या निकालात तुम्हाला काहीही त्रुटी आढळल्या किंवा मनासारखे मार्क्स मिळाले मिळाले नाहीत तर चिंता करू नका. तुम्ही तुमचे पेपर्स रिचेकिंगला देऊ शकता. याची संपूर्ण प्रक्रिया आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
  बरेचदा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स बरेच कमी दिसतात. पेपर चांगले सोडवल्यानंतरही चांगले मार्क्स मिळू शकत नाहीत. यामुळे गुणांमध्येहे फरक पडतो. विद्यार्थ्यांचू निराशा होते. म्हणूनच निकालानंतर पुनर्मूल्यांकनाची व्यव्यस्था करण्यात येते. ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पुनर्मूल्यांकनासाठी द्यायचा असेल त्यांच्यासाठी यंदाही विशेष सोय करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनासाठी बोर्डाकडून देण्यात आलेल्या वेबसाईटवर येत्या 10 जूनपासून अर्ज करता येणार आहे. तसंच पेपर रिचेकिंग देण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शुल्कही भरावं लागणार आहे. अशी असेल रिचेकिंग प्रोसेस पेपर रिचेकिंगला देण्यासाठी आधी विद्यार्थ्यांना आधी ऑफिशिअल या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करायची आहे. यानंतर विद्यार्थ्यांना रिचेकिंगसाठी त्यांचे अर्ज करायचे आहेत. यानंतर विवद्यार्थ्यांचे पेपर्स गुण मूल्यांकनाला जाणार आहेत. यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या पेपर्सच्या छायाप्रत मिळणार आहेत. यानंतरही पेपरमध्ये काही शंका असल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या पेपर्सना रिचेकिंग ला देता येणार आहे. राज्याचा एकूण निकाल 96.94 टक्के; जाणून घ्या स्पेशल निकालाची स्पेशल वैशिष्ट्ये
  स्पेशल निकालाची वैशिष्ट्ये
  महाराष्ट्र स्टेट बोर्ड दहावीचा निकाल हा अखेर जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये दहावीचा एकूण निकाल 96.94 टक्के लागला आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल 97.96 असून विद्यार्थ्यांचा निकाल 96.06 आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 94.40% लागला आहे. एकूण 66 विषयांना सुधारित मूल्यमापन करण्यात आले असून त्यामध्ये 26 विषयांचा निकाल 100% टक्के लागला आहे. राज्यातील शाळांतून 16,38,964 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी शाळांचा निकाल 100 % लागला आहे. सन 2022 चा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल मार्च 2021 च्या निकालाच्या तुलनेत कमी आहे. खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 54,303 एवढी असून त्यांच्या निकालाची टक्केवारी 79.06% आहे.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Board Exam, Exam, Exam Fever 2022, Exam result, State Board

  पुढील बातम्या