जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / SSC Result 2022: दहावीच्या निकालाची तारीख ठरली, उद्या निकाल होणार जाहीर

SSC Result 2022: दहावीच्या निकालाची तारीख ठरली, उद्या निकाल होणार जाहीर

SSC Result 2022: दहावीच्या निकालाची तारीख ठरली, उद्या निकाल होणार जाहीर

Maharashtra SSC Result 2022: महाराष्ट्रातील इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 जून : राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State board of Secondary and Higher Secondary Education) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर (Maharashtra SSC board exam 2022 result date announced) करण्यात आली आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागलेले होते. अखेर प्रतिक्षा संपली असून निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या म्हणजेच 17 जून रोजी दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. 17 जून, 2022 रोजी दु. 1 वा.ऑनलाईन जाहीर होईल असं ट्विट शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.

जाहिरात

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळांवर उद्या दुपारी 1 नंतर उपलब्ध होतील. निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ : http://mahresult.nic.in http://sscresult.mkcl.org https://ssc.mahresults.org.in https://lokmat.news18.com असा चेक करा निकाल इयत्ता 10वीचा महाराष्ट्र SSC निकाल तपासण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी सुरुवातीला www.mahresult.nic.in या महाराष्ट्र बोर्डाच्या निकाल पोर्टलच्या अधिकृत वेबपेजला भेट द्या. SSC परीक्षेसाठी MSBSHSE निकालासाठी अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर SSC परीक्षेचा निकाल हा पर्याय येईल ज्यावर विद्यार्थ्यांना पुढील वेब पेजवर भेट देण्यासाठी क्लिक करा. यानंतर आईचे नाव आणि रोल नंबर ही महत्त्वाची क्रेडेन्शियल्स टाकण्यास विसरू नका. विद्यार्थ्यांना दोन्ही आवश्यक क्रेडेन्शियल्स भरावे लागतील आणि नंतर View Result पर्यायावर क्लिक करा. तुमचा निकाल तुमच्या समोर असेल. पुढील रेफरन्ससाठी निकाल डाउनलोड किंवा सेव्ह करून ठेवा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात