मुंबई, 02, जून : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल कधी जाहीर होतो याकडे सर्व विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं होतं. याच पार्श्वभूमीवर आज म्हणजेच 02 जूनला महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल (Maharashtra SSC Result 2023) जाहीर होत आहे. आपली मुलं चांगल्या मार्कांनी पास होतील का? याचं टेन्शन पालकांना आलं आहे. मात्र निकाल बघण्याआधी विद्यार्थ्यंनी काही मह्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
यंदा राज्यात 15,77,256 विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. ही परीक्षा राज्यभरातील 5033 परीक्षा केंद्रावर पार पडली होती. यावर्षी 2 मार्चपासून ते 25 मार्चपर्यंत परीक्षा चालली होती. गेल्या वर्षी महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16,38,964 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी संपूर्ण 16,38,964 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी 8,89,505 विद्यार्थ्यांची संख्या होती तर 7,49,458 इतकी विद्यार्थिनींची संख्या होती.
निकाल बघण्याआधी गोष्टी ठेवा लक्षात
दहावी निकाल (SSc <span 2023="" data-sheets-value="{" 1":2,“2”:“ssc=”" result="" in="" marathi="" “}"=”" data-sheets-userformat="{" 2":577,“3”:{“1”:0},“9”:0,“12”:0}"=""> Result 2023 In Marathi ) चेक करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि आईचं नाव महत्वाचं असणार आहे.
जर तुमच्या रोल नंबरवरून तुमचा रिझल्ट दिसत नसेल तर तुमच्या आईच्या नावाने तुम्हाला रिझल्ट बघता येणार आहे.
तसंच विद्यार्थ्यांना निकाल चेक करण्याआधी संपूर्ण क्रेडेन्शियल्स बरोबर आहेत ना याची खात्री करणं आवश्यक असणार आहे.
निकाल बघताना तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन बरोबर आहे ना याचीही खात्री करून घ्या.
शक्य असल्यास निकाल हा लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरच बघा.
मोबाईल आणि SMS द्वारेही निकाल बघता येणार आहे.
निकाल आणि निकालानंतर कोणते कोर्सेस करावे, शिक्षणाचे काय ऑप्शन आहेत? तसंच चांगल्या पगाराचा जॉब कसा मिळवावा? या सर्व विषयांची माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.
असा काही ससेकंदात चेक करा तुमचा निकाल
सुरुवातीला https://lokmat.news18.com/news/career/board-results-maharashtra-board/ ही लिंक ओपन करा.
यानंतर तुम्हाला बातमीच्या मध्ये एक बॉक्स दिसेल.
यात तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे.
यांनतर आईचं नाव लिहायचं आहे.
यानंतर तुम्हाला तुमचा क्लास म्हणजे दहावी की बारावी हे सिलेक्ट करायचं आहे.
यानंतर खाली देण्यात आलेल्या गणिताच्या कोड्याचं उत्तर द्यायचं आहे. यांनतर तुम्हाला तुमचा निकाल थेट वेगवान पद्धतीनं बघता येणार आहे.
यानंतर हा निकाल तुम्हाला सेव्हही करता येणार आहे.
किती वाजता जाहीर होणार निकाल
दरवर्षी प्रमाणे यंदाही दहावी बोर्डाचे निकाल हे सुमारे दुपारी एक वाजताच्या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे. हे सर्व निकाल ऑनलाईन पद्धतीनं पोर्टलवर जाहीर होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचं नाव देऊन आपला निकाल बघता येणार आहे.
- Follow us onFollow us on google news