मुंबई, 02, जून: इतके दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा होती तो महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल (Maharashtra Board 10th Result) अखेर घोषित करण्यात आला आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल आज म्हणजेच 02 जूनला जाहीर झाला आहे. News18लोकमत आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या (Maharashtra board result) वेबसाईटवर हा निकाल विद्यार्थ्यांना लाईव्ह बघता येणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थी आणि पालकांच्या मनात धाकधूक वाढली आहे. गेल्या वर्षी ऑफलाईन परीक्षा झाल्यामुळे निकाल काही प्रमाणात कमी लागला होता. मात्र महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा वर्ष 2023 चा निकाल हा 93.83 टक्के लागला आहे. निकाल ऑनलाईन जाहीर होण्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा निकाल 93.83 टक्के टक्के लागला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल दुपारी 2 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. त्याआधी या निकालाची वैशिष्ट्ये बघूया. Maharashtra SSC Result 2023 Live updates: थोड्याच वेळात निकाल, न्यूज18 लोकमतवर सर्वात आधी पाहा असा बघा तुमचा ऑनलाईन निकाल महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल 2023 News18.com वर पाहता येईल. सुरुवातीला https://lokmat.news18.com/news/career/board-results-maharashtra-board/ ही लिंक ओपन करा. यानंतर तुम्हाला बातमीच्या मध्ये एक बॉक्स दिसेल. यात तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे. यांनतर आईचं नाव लिहायचं आहे. यानंतर तुम्हाला तुमचा क्लास म्हणजे दहावी की बारावी हे सिलेक्ट करायचं आहे. यानंतर खाली देण्यात आलेल्या गणिताच्या कोड्याचं उत्तर द्यायचं आहे. यांनतर तुम्हाला तुमचा निकाल थेट वेगवान पद्धतीनं बघता येणार आहे. यानंतर हा निकाल तुम्हाला सेव्हही करता येणार आहे. तुम्ही MSBSHSE च्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला देखील भेट देऊ शकता. 10वीचे निकाल 2022 - lokmat.news18.com वर लाइव्ह 10वी 2022 बोर्ड रिझल्ट ऑनलाइन बघू शकता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल दुपारी २ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.