जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / SSC-HSC Result: दहावी-बारावीचे निकाल कधी? बोर्डाने दिली महत्त्वाची माहिती

SSC-HSC Result: दहावी-बारावीचे निकाल कधी? बोर्डाने दिली महत्त्वाची माहिती

SSC-HSC Result: दहावी-बारावीचे निकाल कधी? बोर्डाने दिली महत्त्वाची माहिती

SSC-HSC Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावी, बारावीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांमध्ये आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 13 मे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला. यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावी, बारावीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांमध्ये आहे. विविध प्रलंबित मागण्यासाठी शिक्षकांनी परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे निकाल उशिरा लागणार का अशी चर्चा होती. मात्र राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, बारावीचा निकाल मे महिन्यातच तर दहावीचा जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. बारावीचा निकाल 31 मे पूर्वी लागू शकतो तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. राज्य शिक्षण मंडळाने दहावीची परीक्षा मार्च महिन्यात घेतली होती. 2 ते 25 मार्च या कालावधीत पेपर झाले होते. दहावीच्या परीक्षेला सुमारे 16 लाख विद्यार्थी बसले होते. तर बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान पार पडली होती. या परीक्षेत 14 लाख विद्यार्थी होते. Maharashtra Board HSC Result 2023: निकालाच्या वेळेत झाला बदल; दुपारी 1 ऐवजी इतके वाजता लागणार रिझल्ट राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितलं की, बोर्डाच्या परीक्षांचे निकाल तयार करण्याचं काम सुरू आहे. यातील बारावीचे निकाल 31 मे पूर्वी आणि दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. संपाचा परिणाम नाही राज्यातील शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी उत्तरपत्रिकांवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे निकाल कधी लागणार? निकालावर याचा परिणाम होणार का? असे प्रश्न निर्माण झाले होते. याशिवाय जुन्या पेन्शनच्या मागणीसाठीही संप पुकारण्यात आला होता. यामुळे अनेक शैक्षणिक कामे झाली नव्हती. पण या संपाचा परिणाम उत्तरपत्रिका तपासणीवर झालेला नाही. आता सीबीएसईने निकाल जाहीर केल्यानंतर राज्य मंडळाच्या दहावी-बारावीच्या निकालाची चर्चा होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात