मुंबई, 02 मार्च : इयत्ता दहावीची परीक्षा 03 मार्चपासून सुरू होत आहे. 23 मार्चपर्यंत ही परीक्षा असणार आहे. या परीक्षेला विद्यार्थ्यांना हॉल तिकीट आणि आपलं आयडीकार्ड परीक्षा केंद्रात घेऊन जाणं अनिवार्य असणार आहे. ज्यांची द्वितीय आणि तृतीय भाषा हिंदी आहे त्यांचा पेपर 6 मार्चला असणार आहे. या पेपरचा अभ्यास करण्यासाठी मध्ये एक दिवसाची सुट्टी मिळाली आहे. हिंदीचा पेपर लिहिताना काही गोष्टी जाणीवपूर्वक लक्षात ठेवायला हव्यात. अंतिम परीक्षा जवळ आली, की खूप वेळा नेमका कसा अभ्यास करावा आणि कशाकडे लक्ष द्यावं याविषयी गोंधळ उडतो. आपण वर्षभर केलेल्या अभ्यासाचं फळ मिळवायचं असेल तर त्या 3 तासात तुम्ही पेपरमध्ये काय लिहिता ते महत्त्वाचं ठरतं. विशेषतः भाषा विषयांचा पेपर लिहिताना खूप काळजी घ्यावी लागते. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे वेळेचं नियोजन करायला हवं आणि आपल्या उत्तरांची परीक्षकांवर छाप पाडण्यासाठी काही युक्त्या लक्षात ठेवायला हव्यात.
For more Sample Papers from Maharashtra State Board, please Click here:
खूप तयारी करूनही ऐन पेपरच्या दिवशी गडबड होऊ नये म्हणून पेपर सोडवण्याचा सराव आवश्यक आहे. हा हिंदीचा सराव परीक्षेचा पेपर किंवा हिंदीचा Sample Paper सोडवून पाहाआणि मग खाली दिलेल्या परीक्षेआधीच्या टिप्स वाचा भाषा विषयात लिखाण खूप असतं. बऱ्याचदा लेखनाचा कंटाळा किंवा सूचत नाही म्हणून आपण प्रश्न सोडवत नाही अशावेळी काही छोट्या गोष्टी पेपर लिहिण्याआधी डोक्यात ठेवल्या तर आपल्याला वेळत नीट पेपर सोडवून चांगले मार्क मिळवता येतील. पास होण्यासोबतच चांगले मार्क मिळवण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहोत. परीक्षा केंद्रावर जाण्याआधी या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. चांगल्या मार्कांनी पास होण्यासाठी टिप्स 1. पेपरला जाण्याआधी पेपरचा पॅटर्न पाहा. कोणत्या प्रश्नाला किती मार्क आहेत हे पाहून त्यानुसार वेळेचं नियोजन करा. 2. उत्तर लिहिताना प्रश्न क्रमांक आणि त्यातील उप प्रश्न नीट क्रमांक देऊन सोडवा. नवीन प्रश्न नव्या पानावर सोडवा. 3. सोप्या प्रश्नाकडून अवघड प्रश्नाकडे या त्यामुळे आपला वेळ वाचेल. पत्र लेखन, निबंध जिथे मार्क मिळून देणारे प्रश्न आहेत ते सोडू नका किमान ते पहिले सोडवण्यावर भर द्या. 4. पेपर सोडवताना खाडाखोड, गजबन करू नका. सुटसुटीत आणि छान मुद्देसुत लिहा. विषयाची सुरुवात आणि शेवट चांगला करा. त्यामुळे पर्यावेक्षकावर त्याचा प्रभाव चांगला पडतो. 5. गद्य प्रश्न लिहिताना परिच्छेदाचा वापर करा. लिहिणार चुका होणार नाहीत लेखन शुद्ध असेल याची काळजी घ्या.