Breaking News: 10वी, 12वीच्या निकालाची तारीख ठरली? 'या' तारखांना निकाल जाहीर होण्याची शक्यता
Breaking News: 10वी, 12वीच्या निकालाची तारीख ठरली? 'या' तारखांना निकाल जाहीर होण्याची शक्यता
हे निकाल वेळेतच लागण्याची शक्यता
निकाल नेहमीपेक्षा उशिरा (Board Result may declare soon in MH) जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता बोर्डाच्या निकलाबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे.
मुंबई, 09 मे: कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्व शाळा आणि कॉलेजेस बंद होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण (Online Education) देण्यात येत होतं. गेल्या वर्षी बोर्डाच्या परीक्षाही (Board Exam Result) करण्यात आल्या होत्या. त्यानंतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा निकाल विशेष मूल्यांकन पद्धतीनं लावण्यात आला होता. यंदा बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं (Offline Board Exams) घेण्यात आल्या आहेत.त्यामुळे बोर्डाच्या परीक्षांचा निकाल नेहमीपेक्षा उशिरा (Board Result may declare soon in MH) जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता बोर्डाच्या निकलाबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे.
राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे पेपर पूर्णपणे तपासून झाले आहेत अशी माहिती SSC आणि HSC बोर्डाकडून देण्यात आली आहे. त्यामुले राज्यात लवकरच दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे परीक्षा उशिरा घेण्यात आल्यात त्यामुळे बोर्डासमोर निकाल वेळेत लावण्याचं मोठं आव्हान होतं. तरीही यंदा हे निकाल वेळेतच लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
MBA साठी CAT Exam देणं महत्त्वाचं; पात्रता आणि पॅटर्नविषयी इथे मिळेल माहिती
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे (MSBSHSE) द्वारे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल तयार केला जात आहे. काही मीडिया रिपोर्ट्स प्रमाणे स्टेट बोर्डाचे दहावी परीक्षेचा निकाल हा येत्या 20 जूनपर्यंत तर बारावी परीक्षेचा निकाल हा 10 जूनपर्यंत जाहीर करण्यात येणायची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी सूत्रांनी अशी माहिती दिली आहे. राज्यातील सर्व शहरांमध्ये शिक्षक जोमानं पेपर तपासणीला लागले होते. त्यात काही भागांमध्ये तांत्रिक अडचणीही आल्या. मात्र आता याचा सामना करून बोर्डानं पेपर तपासणी पूर्ण केल्याचं सांगितलं आहे.
मोठी बातमी! NEET PG परीक्षेसंदर्भातील 'ते' परिपत्रक Fake; या तारखेला होणार ExamFYJC प्रवेश होणार सुरु
नुकतेच महाराष्ट्र FYJC प्रवेश 2022 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, ज्याच्या आधारे निकाल मेच्या मध्यापर्यंत जाहीर होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. FYJC प्रवेश 2022 च्या जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, प्रवेश प्रक्रिया 17 मे पासून सुरू होणार आहे. त्यानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. अशा स्थितीत अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी या वर्गांचा निकाल जाहीर होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.