जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / भारतात 10 पैकी 7 महिला नोकरी सोडत आहेत किंवा सोडण्याच्या विचारात; काय आहे कारण?

भारतात 10 पैकी 7 महिला नोकरी सोडत आहेत किंवा सोडण्याच्या विचारात; काय आहे कारण?

करिअर

करिअर

लिंक्डइनच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की 10 पैकी 8 (83 टक्के) काम करणाऱ्या महिलांना असे वाटले आहे की त्यांना महामारीच्या प्रभावानंतर अधिक लवचिकपणे काम करायचे आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 एप्रिल : महिलाना नोकरी करताना घर आणि नोकरी अशी दुहेरी भूमिका निभवावी लागते. मात्र अशी तारेवरची कसरत करत असाताना महिलांना नोकरी करतानाचा अनुभव सांगणाना धक्कादायक सर्वे समोर आला आहे. वेतन कपात, पक्षपातीपणा आणि लवचिकतेचा अभाव (Lack of workplace flexibility) यामुळे भारतातील मोठ्या संख्येने महिला यावर्षी नोकरी सोडत आहेत किंवा सोडण्याचा विचार करत आहेत. आघाडीच्या ऑनलाइन व्यावसायिक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म लिंक्डइनने (LinkedIn) एका अहवालात ही माहिती दिली आहे. कामाच्या ठिकाणी महिलांना (Working Womwn) भेडसावणाऱ्या आव्हानांवर प्रकाश टाकण्यासाठी कंपनीने मंगळवारी भारतातील 2,266 प्रतिसादकर्त्यांवर आधारित त्यांचे ग्राहक संशोधन प्रसिद्ध केले. लिंक्डइनच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की 10 पैकी 8 (83 टक्के) काम करणाऱ्या महिलांना असे वाटले आहे की त्यांना महामारीच्या प्रभावानंतर अधिक लवचिकपणे काम करायचे आहे. Petrol-Diesel Prices: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, चेक करा तुमच्या शहरात काय आहे किंमत? 70 टक्के लोकांनी आधीच नोकरी सोडली संशोधनात असे म्हटले आहे की 72 टक्के नोकरदार महिला अशा नोकरी नाकारत आहेत जी त्यांना लवचिकपणे काम करू देत नाही. तसेच, 70 टक्के आधीच सोडले आहेत किंवा सोडण्याचा विचार करत आहेत. सर्वेक्षण केलेल्या पाच पैकी दोन महिलांनी सांगितले की लवचिकता त्यांच्या काम आणि वैयक्तिक जीवनात चांगला समतोल राखते आणि त्यांना त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाण्यास मदत करते. त्याच वेळी, तीनपैकी एका महिलेने सांगितले की यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य सुधारते आणि त्यांच्या सध्याच्या नोकऱ्यांमध्ये राहण्याची शक्यता वाढते. Home Loan घेण्याचा विचार करत आहात? कोणत्या बँका सर्वात स्वस्त कर्ज देत आहेत, पाहा लवचिक धोरणांची गरज लिंक्डइनच्या इंडिया टॅलेंट अँड लर्निंग सोल्युशन्सच्या वरिष्ठ संचालक रुची आनंद म्हणाल्या की, हे कंपन्यांना आणि नियोक्ते यांना सतर्क करते की त्यांना त्यांची उच्च प्रतिभा गमावायची नसेल तर त्यांनी प्रभावी लवचिक धोरणे आणली पाहिजेत. लिंक्डइन ‘करिअर ब्रेक्स’ हे एक नवीन वैशिष्ट्य सादर करत आहे, जे सदस्यांना त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलमध्ये करिअर ब्रेक जोडण्यास आणि त्या दरम्यानचे त्यांचे अनुभव शेअर करण्यास अनुमती देते. ते ज्या भूमिकेसाठी अर्ज करत आहेत त्यात करिअर ब्रेक दरम्यानचे अनुभव त्यांना कशी मदत करतात हे समजावून सांगण्यास सदस्य सक्षम असतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: job , linkedin , money
  • First Published :
जाहिरात
जाहिरात