मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Success Story: ऑल इंडिया रँक 01 मिळवत उत्तीर्ण केली CA Inter परीक्षा; आता म्हणते MBA करणार Crack; जाणून घ्या अभ्यासाच्या टिप्स

Success Story: ऑल इंडिया रँक 01 मिळवत उत्तीर्ण केली CA Inter परीक्षा; आता म्हणते MBA करणार Crack; जाणून घ्या अभ्यासाच्या टिप्स

यश मिळालं की भारावून न जाता पुढील शिक्षणासाठी सरसावणाऱ्या आणि आपलं स्वप्न पूर्ण करू इच्छिणाऱ्या प्रीतीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

यश मिळालं की भारावून न जाता पुढील शिक्षणासाठी सरसावणाऱ्या आणि आपलं स्वप्न पूर्ण करू इच्छिणाऱ्या प्रीतीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

यश मिळालं की भारावून न जाता पुढील शिक्षणासाठी सरसावणाऱ्या आणि आपलं स्वप्न पूर्ण करू इच्छिणाऱ्या प्रीतीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 21 सप्टेंबर: एखादी उंच टेकडी चढली आपल्याला प्रचंड आनंद मिळतो. अंतर त्यानंतरही इच्छा असते टी म्हणजे पर्वत सर करण्याची. यश (Successful stories) मिळालं की आपला आत्मविश्वास (How to be successful) वाढतो हे नक्कीच. असंच काहीसं घडलंय मुंबईच्या प्रीती नंदन कामत (Priti Nadan Kamat) या विद्यार्थिनीसोबत. ICAI CA इंटरमिडिएट  (CA exam Topper) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत प्रीतीनं ऑल इंडिया रँक 01 मिळवत यश (Success story of CA topper) गाठलंय. मात्र आता तिनं इथवरच न थांबत MBA करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यासोबतच Test of Proficiency in Korean (TOPIK) हा कोर्सही करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणताही यश मिळालं की भारावून न जाता पुढील शिक्षणासाठी सरसावणाऱ्या आणि आपलं स्वप्न पूर्ण करू इच्छिणाऱ्या प्रीतीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. "मला भारतात MBA पूर्ण करायचं आहे आणि दक्षिण कोरियाला  (South Korea) जायचं आहे.तिथे तिथे सॅमसंगसाठी (Samsung) काम करायचं आहे. मला नेहमीच कोरियन भाषेत रस आहे आणि अशा प्रकारे माझा Resume अधिक वैविध्यपूर्ण असेल. यामुळे माझं profile मोठं होईल. CA मध्ये माझी अकाउंटन्सीची संकल्पना स्पष्ट झाली आणि MBA मध्ये मला मॅनेजमेंट सिस्टम (management system) कशी कार्य करते याची कल्पना येईल, त्यामुळे मला परिपूर्ण होता येईल" असं प्रीतीनं News 18 शी बोलताना सांगितलं आहे.

हे वाचा - Rail Kaushal Vikas Yojana: 10वी उत्तीर्ण उमेदवारांना Railway देणार ट्रेनिंग; आज शेवटची तारीख; लगेच करा अप्लाय

आपल्या अभ्यास करण्याच्या पद्धतींबद्दल सांगता प्रीती म्हणते, "एखादी परीक्षा उत्तीर्ण कारण्यासाठी फक्त ऑनलाईन क्लास पुरेसे नाहीत. रस्ताही तुम्हाला स्वतःला वेळ देऊन अभ्यासाचं नियोजन करणं आवश्यक आहे. तसंच ऑनलाईन क्लास सुरु असल्यामुळे आपण आपल्या सोयीनुसार क्लास करतो, मात्र हे बरोबर नाही. यामुळे आपण अधिक निष्क्रय होतो आणि अभ्यासाला गांभीर्यानं घेत नाही. फक्त ऑल इंडिया रँकसाठी अभ्यास न करता समजून घेऊन अभ्यास करणं महत्त्वाचं आहे."

"जर आपण ऑनलाईन क्लास करत आहोत तर हे अगदी उत्तम आहे. पण क्लासनंतरही आपल्याला स्वतःला काही अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. आपण पूर्णतः क्लासवर अवलंबून राहू शकत नाही," असंही प्रीती सांगते.

कोरोनाच्या काळात मी स्वतःला तयार करत सेल्फ स्टडी करण्याचा निर्णय घेतला. या काळात स्वतःच स्वतःचा टाइम टेबल बनावट अभ्यास पूर्ण करणं आवश्यक होतं. तसंच सकाळी दुपारी आणि संध्याकाळी कोणता अभ्यास करायचा याचंही नियोजन मी तयार केलं होतं. खासगी नोकरी करणाऱ्या माझ्या आईनंही मला माझ्या अभ्यासात मदत केली," असंही प्रीती सांगते.

First published:

Tags: Career, MBA, Success stories