मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Study Abroad: तुम्हीही परदेशात शिक्षणाचं स्वप्नं बघताय? मग या स्कॉलरशिप्स बदलतील तुमचं नशीब

Study Abroad: तुम्हीही परदेशात शिक्षणाचं स्वप्नं बघताय? मग या स्कॉलरशिप्स बदलतील तुमचं नशीब

योग्य स्कॉलरशिपसाठी खूप शोध घेणं असतं. स्कॉलरशिपचे काही प्रकारदेखील आहेत. स्कॉलरशिपच्या मदतीनं तुम्ही परदेशात अगदी मोफतही शिक्षण घेऊ शकता.

योग्य स्कॉलरशिपसाठी खूप शोध घेणं असतं. स्कॉलरशिपचे काही प्रकारदेखील आहेत. स्कॉलरशिपच्या मदतीनं तुम्ही परदेशात अगदी मोफतही शिक्षण घेऊ शकता.

योग्य स्कॉलरशिपसाठी खूप शोध घेणं असतं. स्कॉलरशिपचे काही प्रकारदेखील आहेत. स्कॉलरशिपच्या मदतीनं तुम्ही परदेशात अगदी मोफतही शिक्षण घेऊ शकता.

मुंबई, 05 जुलै:  परदेशात (Abroad) जाऊन शिक्षण (Education) घेणं हे अनेक युवक-युवतींचं स्वप्न असतं. यासाठी पालक त्यांच्या पातळीवर आर्थिक नियोजन करत असतात. आज जगभरातल्या अनेक देशांमध्ये शिक्षणाच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे शिक्षणासाठी नेमक्या कोणत्या देशाची, शिक्षणसंस्थेची निवड करावी, असा संभ्रम युवकांमध्ये पाहायला मिळतो. अर्थात यामागे आर्थिक कारण प्रमुख असतं. प्रत्येक देशात राहण्याचा, शिक्षणाचा आणि अन्य गोष्टींचा खर्च वेगवेगळा असतो. त्यामुळे कमी खर्चात शिक्षण हा पर्याय निवडण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. परदेशात शिक्षण घेण्यासाठी बहुतांश विद्यार्थी कर्ज (Loan) घेतात. परंतु, शिष्यवृत्ती अर्थात स्कॉलरशिप (Scholarship) हा पर्यायदेखील यासाठी उपलब्ध असतो. योग्य स्कॉलरशिपसाठी खूप शोध घेणं असतं. स्कॉलरशिपचे काही प्रकारदेखील आहेत. स्कॉलरशिपच्या मदतीनं तुम्ही परदेशात अगदी मोफतही शिक्षण घेऊ शकता. `नवभारत टाइम्स`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 15.6 अब्ज युरो म्हणजे किती, हे तुम्हाला माहिती आहे का? हा प्रश्न विचारायचं कारण म्हणजे, दर वर्षी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या स्कॉलरशिपचं हे अंदाजे मूल्य आहे. परदेशात शिक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर आवश्यक रक्कम (Fund) उभी करावी लागते. त्यात कॉलेजची फी, राहण्याचा खर्च आदींचा समावेश असतो; पण अशी रक्कम उभी करण्यासाठी तुम्ही कर्जाव्यतिरिक्त स्कॉलरशिपची मदत घेऊ शकता. या स्कॉलरशिपचे अनेक प्रकार आहेत. मेरिट बेस्ड (Merit Based) अर्थात गुणवत्तेवर आधारित स्कॉलरशिप त्यापैकीच एक होय. ही स्कॉलरशिप अनेक निकषांच्या आधारे दिली जाते. त्यात छंद, टॅलेंट, अचीव्हमेंट, शैक्षणिक किंवा भविष्यातला करिअर स्कोप (Career Scope) या गोष्टी समाविष्ट असतात. ही स्कॉलरशिप फेडरल आणि राज्य सरकार, मोठ्या कंपन्या, स्थानिक व्यावसायिक संस्था किंवा विद्यापीठांद्वारे दिल्या जाऊ शकतात. परदेशात शिक्षणासाठी स्टुडंट लोन (Student Loan) हा एक पर्याय उपलब्ध असतो; मात्र या रकमेची तुम्हाला परतफेड करावी लागते. ती काही फरकांसह इतर कोणत्याही कर्जासारखीच असते. तुम्ही सरकारी किंवा खासगी बॅंकेकडून स्टुडंट लोन अर्थात विद्यार्थी कर्ज घेऊ शकता. ही बॅंक तुमच्या देशातली असू शकते किंवा ज्या देशात तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे, त्या देशातली अर्थात परकीय बॅंक असू शकते. खासगी विद्यार्थी कर्ज पालक किंवा कायदेशीर शिक्षकासह मिळतं. ती खूप सामान्य बाब आहे. कारण बहुतेकशा विद्यार्थ्यांकडे कर्ज मिळवण्यासाठी क्रेडिट हिस्ट्री नसते. तथापि, सरकारकडून मिळू शकणारं विद्यार्थी कर्ज घेणं अधिक फायदेशीर ठरतं. कारण त्याचा व्याज दर सामान्यतः कमी असतो. काही कर्जं आर्थिक गरजांवर आधारित असतात. केवळ एका खेळाचा अभ्यास, सराव करू इच्छिता आणि कॉलेज किंवा विद्यापीठाच्या टीमचा सदस्य होऊ इच्छित असाल तर तुम्ही स्पोर्ट्स स्कॉलरशिपसाठी (Sport Scholarship) पात्र ठरू शकता. ही स्कॉलरशिप कॉलेज किंवा विद्यापीठाकडून प्रदान केली जाते. तुम्ही ज्या खेळाचा सराव करता त्यामध्ये तुम्ही सर्वोत्तम असण्याची गरज नाही. कधी कधी स्थानिक गट किंवा वैयक्तिक संस्था या स्पोर्ट्स स्कॉलरशिप देऊ शकतात आणि त्या यासाठी स्पोर्ट्स निकषांचा संदर्भ घेऊ शकतात. विशिष्ट अर्थात स्पेसिफिक स्कॉलरशिप (Specific Scholarship) ही एखाद्या जातीची पार्श्वभूमी किंवा कौटुंबिक संलग्नता असलेल्या विद्यार्थ्यांना दिली जाते. ही स्कॉलरशिप अल्पसंख्याक वर्गातल्या विद्यार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी दिली जाते. काही देशांमध्ये (बेल्जियम, फ्रान्स, यूएस) स्थानिक सरकार विशिष्ट देशांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप देतं. उदाहरणार्थ, आफ्रिकन, दक्षिण अमेरिकी आणि आशियाई देशांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांना बेल्जियम विशेष स्कॉलरशिप देतं. ज्या क्षेत्रात ऐतिहासिकदृष्ट्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी कमी प्रतिनिधित्व केलं आहे, अशा क्षेत्रांमध्ये त्यांना शिक्षण घेता यावं, यासाठी मदत करण्याकरिता हा कार्यक्रम राबवला जातो. काही संस्था अपंग, शिकण्यास सक्षम नसलेल्या आणि दुर्बल आरोग्य स्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देतात. काही विद्यापीठंही स्कॉलरशिप (University Scholarship) देतात. शैक्षणिकदृष्ट्या उत्तम कामगिरी केलेल्या आणि एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त वय नसलेल्या (उदाहरणार्थ, 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे) विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप मिळते. याशिवाय प्रत्येक कॉलेज आणि विद्यापीठ पातळीवर एक विशेष स्कॉलरशिप दिली जाते. स्कॉलरशिपमध्ये शैक्षणिक फी, दर महिन्याचा राहण्याचा खर्च, विमानाचं इकॉनॉमी क्लासचं तिकीट, तसंच आवश्यक खर्चासाठी अतिरिक्त अनुदान आणि भत्ते दिले जातात. एकूण तुम्ही तुमची योग्यता आणि गरज तपासून स्कॉलरशिप किंवा कर्जाची मदत घेऊन परदेशात शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करू शकता.
First published:

Tags: Career, Career opportunities, Education

पुढील बातम्या