मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

सावधान! Resume तयार करताना चुकूनही देऊ नका खोटी माहिती; अन्यथा हातची जाईल नोकरी; वाचा Tips

सावधान! Resume तयार करताना चुकूनही देऊ नका खोटी माहिती; अन्यथा हातची जाईल नोकरी; वाचा Tips

Resume बनवण्याच्या काही टिप्स

Resume बनवण्याच्या काही टिप्स

Resume बनवताना अनेक गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे, त्यात जर तुम्ही चुकीची माहिती दिली तर तुम्हाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 17 डिसेंबर: कोणत्याही कंपनीत नोकरीची पहिली पायरी म्हणजे उमेदवारांचा Resume. (Interview Tips). जर तुम्ही चांगला रेझ्युमे (How to make best Resume) बनवून बॉस आणि HRला प्रभावित केलं तर तुमचा करिअरचा मार्ग अधिक सोपा होईल (Growth in Career). परंतु प्रत्येकजण पूर्णपणे प्रभावी रेझ्युमे (How to make Resume) बनवू शकत नाही. Resume बनवताना अनेक गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे, त्यात जर तुम्ही चुकीची माहिती दिली तर तुम्हाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

HR असो किंवा कोणत्याही कंपनीचा बॉस, उमेदवार निवडताना ते प्रथम तुमचा रेझ्युमे बघतात (Resume Tips). जर तुम्ही रेझ्युमेमध्ये काही चुकीची माहिती दिली असेल, तर नंतर सत्य बाहेर आल्यावर तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे तुम्हाला जे काही माहीत आहे, जी काही पदवी मिळवली आहे, त्याचा उल्लेख बायोडेटामध्ये अचूक लागल्या गेला पाहिजे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमचा अचूक Resume बनवू शकाल. चला तर मग जाणून घेउया.

अनावश्यक माहिती लिहू नका

काही वैयक्तिक माहिती रेझ्युमेमध्ये द्यावी लागेल. बरेच लोक त्यात अनावश्यक गोष्टी लिहितात, ज्याचा नंतर खूप वाईट परिणाम होतो. त्यात अनावश्यक काहीही लिहू नये. वैयक्तिक तपशीलाच्या नावावर, फक्त तुमचे पूर्ण नाव, जन्मतारीख, पत्ता, संपर्क क्रमांक आणि ईमेल आयडी लिहा.

तुम्हीही फ्रेशर्स असाल तर 'हे' महत्त्वाचे Certifications नक्की करा

योग्य जॉब ऑब्जेक्टिव्ह लिहा

जॉब ऑब्जेक्टिव्हमध्ये उमेदवाराला त्याच्या करिअरच्या ट्रेंडबद्दल लिहावे लागते. करिअरची जी काही उद्दिष्टे तुम्ही स्वत:साठी ठेवली आहेत, त्याबद्दल थोडक्यात लिहायला हवे. तुमच्या पात्रता आणि कौशल्यांबद्दल थोडक्यात लिहा.

खोटी पात्रता लिहू नका

रेझ्युमेमध्ये तुम्हाला तुमच्या शैक्षणिक पात्रतेचा क्रमवार तपशील द्यावा लागेल. यामध्ये पदवी, संस्थेचे नाव, उत्तीर्ण होण्याचे वर्ष, उत्तीर्ण होण्याची श्रेणी इत्यादी माहिती द्या. तुम्हाला कोणताही पुरस्कार मिळाला असेल तर तुम्ही त्याबद्दलही लिहू शकता. मात्र यापैकी कोणतीच माहिती खोटी लिहू नका.

एक्सट्रा कोर्सेसबद्दल अचूक लिहा

तुम्ही शिक्षण घेत असताना कोणताही अतिरिक्त कोर्स केला असेल किंवा डिप्लोमा केला असेल तर त्याचीही माहिती बायोडाटामध्ये द्या. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात विशेष कामगिरी केली असेल तर त्याबद्दलही लिहू शकता.

First published:

Tags: Career opportunities, Tips, जॉब