मुंबई, 16 ऑगस्ट: आजकाल सिनेमांमध्ये (Movies), वेब सिरीजमध्ये (Web series) आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे Animated कार्टून्स (Animated Cartoons) आणि सिनेमांमध्ये व्हॉइस ओव्हर (Voice over artist) आणि डबिंग आर्टिस्टना (Dubbing Artist) प्रचंड मागणी आहे. आपल्या निरनिराळ्या आवाज शैलीमुळे डबिंग आर्टिस्ट प्रेक्षकांची मनं जिंकून घेतात. मात्र हे डबिंग आर्टिस्ट असे आवाज नक्की काढतात तरी कसे? आणि डबिंग आर्टिस्ट, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट यामध्ये करिअर (Career in Dubbing Artist) करण्यासाठी नक्की काय योग्यता (How to make career in Voice over and dubbing) असणं महत्वाचं आहे.? याबद्दल कधी विचार केला आहे का? याचबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. आज नाटक, रेडिओ, टीव्ही, जाहिरात, माहितीपट, अॅनिमेशन चित्रपट, ऑडिओ बुक्स इत्यादी चित्रपटांमध्ये डबिंग कलाकारांना मोठी मागणी आहे. जर तुमच्याकडे ती गोष्ट असेल तर तुमचा आवाज तुम्हाला एक वेगळी ओळख देऊ शकतो. तर व्हॉईस ओव्हर किंवा डबिंग आर्टिस्ट म्हणून करिअरची संभावना, कोर्स, पगार (Salary of Dubbing Artist) इत्यादी जाणून घेऊया. शैक्षणिक योग्यता डबिंग आर्टिस्ट होण्यासाठी कोणतीही विशेष पात्रता आवश्यक नाही. जर तुमचा आवाज मजबूत असेल आणि तुमची भाषाशैली मजबूत असेल तर तुम्ही या क्षेत्रात प्रवेश करू शकता. तरीही किमान 12 वी पास असणं आवश्यक आहे. काही काळासाठी, डबिंग आर्टिस्ट किंवा व्हॉईस ओव्हर आर्टिस्टचे कोर्सेस देखील चालवले जातात ज्यात विद्यार्थ्यांना व्हॉईस ओव्हरचेटेक्निकल कोर्सेस शिकवले जातात.. मात्र अजूनही अद्याप व्हॉईस आर्टिस्ट किंवा डबिंग आर्टिस्टसाठी कोणताही डिप्लोमा किंवा पदवी अभ्यासक्रम नाही. याबद्दलचे शॉर्ट टर्म कोर्सेस उपलब्ध आहेत. हे वाचा - Job Alert: भारती विद्यापीठ पुणे इथे विविध पदांसाठी होणार पदभरती कोणते गुण असणं आवश्यक जर तुम्हाला व्हॉईस आर्टिस्ट किंवा डबिंग आर्टिस्ट म्हणून करिअर करायचे असेल तर तुमच्यात काही विशेष गुण असणं आवश्यक आहे. व्हॉईस आर्टिस्टसाठी व्हॉइस मॉड्युलेशन, उच्चारण, भाषा यावर कमांड असणं खूप महत्वाचं आहे. या व्यतिरिक्त रोल आणि परिस्थितीनुसार आवाज बदलणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ भावना आणि विनोदानुसार आपला आवाज मोल्ड करणं आवश्यक आहे. किती मिळतो पगार डबिंग आर्टिस्ट म्हणून करिअर केलं तर चांगले पैसे मिळत नाहीत तर नाव आणि प्रसिद्धी देखील मिळते. सुरुवातीला एका डबिंग आर्टिस्टला दरमहा 10 - 25 हजार रुपये सहज मिळतात. पण वाढत्या अनुभवामुळे दरमहा 40 - 50 हजार रुपये मिळू शकतात. याशिवाय डबिंग आर्टिस्ट फ्रीलांसर आणि कॉन्ट्रॅक्टवर काम करून दररोज हजारो रुपये कमवू शकतो. चित्रपटांमध्ये हिरो किंवा हेरोईनचे आवाज डब करणाऱ्या कलाकारांना प्रति चित्रपट 1 लाख ते 5 लाख रुपये मिळतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.