मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Job मिळवण्यासाठी केवळ अनुभवाचीच गरज नाही; 'हे' गुण असतील तर फ्रेशर्सनाही मिळेल नोकरी; वाचा सविस्तर

Job मिळवण्यासाठी केवळ अनुभवाचीच गरज नाही; 'हे' गुण असतील तर फ्रेशर्सनाही मिळेल नोकरी; वाचा सविस्तर

Success

Success

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्ही फ्रेशर्स (How to get job as fresher) असाल तरी तुम्हाला जॉब मिळू शकतो.

मुंबई, 02 डिसेंबर: Freshers असणं हा एखादा गुन्हा आहे की काय? असं देशभरातील अनेक फ्रेशर्सना (Freshers Jobs) वाटत असतं. याचं कारणही तसंच आहे. नेहमी अनुभवी उमेदवारांना जॉबमध्ये (jobs for Freshers) प्राधान्य दिलं जातं. अनुभवी उमेदवार असतील तर ते अधिक चांगल्या पद्धतीनं का करू शकतील असं अनेक कंपन्यांना वाटतं. मात्र यामुळे फ्रेशर्सना जॉब (Why freshers not getting jobs) मिळू शकत नाही. जर तुम्हीही फ्रेशर असाल तर याबाबत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्ही फ्रेशर्स (How to get job as fresher) असाल तरी तुम्हाला जॉब मिळू शकतो. चला तर मग जाणून घेउया काही टिप्स.

फ्रेशर म्हणून नोकरी मिळवणे सोपे नाही (Jobs tips for freshers). कामाचा अनुभव नसल्यामुळे कोणतीही कंपनी त्यांना कामावर घेत नाही आणि ते इकडे तिकडे अर्ज करत राहतात. थोडं मन लावलं तर एखादी नोकरी अगदी फ्रेशर (How to find jobs as freshers) म्हणूनही सहज मिळवता येते. यासाठी तुम्हाला एक खास योजना बनवावी लागेल.

सुरुवातीला Internship शोधा    

जर फ्रेशर म्हणून नोकरी शोधण्यात अडचण येत असेल, तर आधी चांगल्या कंपनीत इंटर्नशिप करणे अधिक योग्य ठरेल (Job Tips For Freshers). याच्या मदतीने तुम्हाला वर्क कल्चर समजण्यास सुरुवात होईल आणि इंडस्ट्रीमध्ये संपर्क निर्माण करण्यातही मदत होईल. इंटर्नशिप (Internship for freshers) दरम्यान शक्य तितक्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा आणि तुमचे सर्वोत्तम द्या.

IT क्षेत्रात करिअर करायचंय? मग 'या' टॉप Programming Languages शिकणं महत्वाचं

अनुभवी लोकांचं मार्गदर्शन घ्या

प्रथमच नोकरी मिळवणे सोपे नाही. प्रथम संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांशी ओळख करून घ्या आणि स्वत:ला मार्गदर्शक बनवा, जो तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल. सोशल मीडिया, शाळा-कॉलेजमधील ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेत राहा.

प्रोफाइल बिल्ड करत राहा

तुमचा Resume आकर्षक बनवण्यासाठी, त्यात पात्रतेसह काही स्किल सेट जोडा. तुमच्याकडे वेळ असेल तर तुमच्या नोकरीसाठी काम येणारे डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स (Online certification courses) करा. यामुळे तुमचा CV प्रभावी होईल

Techie बना

सध्या केवळ अभ्यासक्रमाचे ज्ञान पुरेसे नाही. गर्दीपासून दूर राहून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तुमचे तांत्रिक ज्ञान (Technology friendly) वाढवा. तंत्रज्ञानातील प्रगतीसह अद्ययावत रहा.

First published:

Tags: Career, जॉब