मराठी बातम्या /बातम्या /करिअर /गृहिणींनो, घरबसल्या व्हा Business Woman; दुपारच्या रिकाम्या वेळात सुरु करा हे व्यवसाय; मिळतील भरघोस पैसे

गृहिणींनो, घरबसल्या व्हा Business Woman; दुपारच्या रिकाम्या वेळात सुरु करा हे व्यवसाय; मिळतील भरघोस पैसे

गृहिंणीनो, हीच तुमची इच्छा आता प्रत्यक्षात उतरू शकते.

गृहिंणीनो, हीच तुमची इच्छा आता प्रत्यक्षात उतरू शकते.

आज आम्ही तुम्हाला असे काही व्यवसाय (best business for House wife) सांगणार आहोत जे करून तुम्ही Business Woman होऊ शकता.

मुंबई, 12 डिसेंबर: आजकालच्या महागाईच्या काळात प्रत्येकाला कमाईचं दुसरं साधन (How to find second source of income) हवंय. यासाठी कभी गृहिणींनी निरनिराळ्या क्षेत्रात जॉब जॉईन (Jobs for Housewives) केले आहेत. मात्र अजूनही अशा काही महिला गृहिणी आहेत ज्यांना घरच्या कामात असताना स्वतःसाठी किंवा स्वतःच्या व्यवसायासाठी (Business for home makers) वेळ मिळू शकत नाही. अनेक गृहिणींना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची घराला आर्थिक हातभार लावण्याची इच्छा असते. गृहिंणीनो, हीच तुमची इच्छा आता प्रत्यक्षात उतरू शकते. आज आम्ही तुम्हाला असे काही व्यवसाय (best business for House wife) सांगणार आहोत जे करून तुम्ही Business Woman होऊ (How to become Business Woman) शकता. भरघोस पैसे कमवू शकता. चला तर मग जाणून घेऊया.

टिफिन सर्व्हिस आहे उत्तम  

तुम्हाला स्वयंपाक करण्यात रस असेल आणि तुम्ही डिलिव्हरी पार्टनरची व्यवस्था करू शकत असाल, तर तुम्ही ऑनलाइन टिफिन सेवा सुरू करू शकता. यामध्ये तुम्ही रोजचे काही टिफिन बांधून त्यांचा मेनू निश्चित करू शकता. मोठ्या शहरांमध्ये टिफिन सेवेचा ट्रेंड खूप वाढला आहे. यामध्ये सोशल मीडियावर ग्रुप बनवूनही ऑर्डर घेता येईल.

हॅण्डमेड ज्वेलरी

आजकाल लग्न आणि इतर समारंभात हॅण्डमेड ज्वेलरी घालणे खूप पसंत केले जात आहे. जर तुम्ही सर्जनशील असाल आणि दागिने बनवू शकत असाल तर त्याचा व्यवसाय सुरू करणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. हाताने बनवलेले दागिने ऑनलाइनही विकता येतात. त्याची किंमत 10 हजार ते 20 हजार रुपये असू शकते. त्यामुळे दुपारच्या वेळात तुम्ही हॅण्डमेड ज्वेलरी बनवून भरघोस पैसे कमवू शकता.

क्या बात है! आता घरबसल्या कमवा लाखो रुपये; YouTube वर फक्त अपलोडींगचं काम

बेकिंग व्यवसाय उत्तम

कोरोनाच्या काळात लोकांनी बाहेरचे खाणे-पिणे कमी केले आहे. आता ते घरच्या वस्तू शोधत राहतात. जर तुम्हाला बेकिंगमध्ये रस असेल, तर तुम्ही बिस्किटे, कुकीज आणि केक इत्यादी बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. एकूण 5 हजार ते 15 हजार रुपये गुंतवल्यानंतर तुम्ही त्यात चांगली कमाई करू शकता.

ट्युशन हा उत्तम पर्याय

आजकाल ऑनलाईन शिक्षणामुळे अनेक मुलं ऑनलाईन ट्युशन शिकू लागली आहेत. तुम्हाला शिकवण्यात स्वारस्य असल्यास आणि काही पूर्वीचा अनुभव असल्यास, तुम्ही ऑनलाइन अध्यापन सुरू करू शकता.

First published:
top videos

    Tags: Business, Career opportunities, जॉब