मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

11 वर्षांच्या मुलाने रचला इतिहास; IQ टेस्टमध्ये मिळाले 162 गुण; दिग्गज शास्त्रज्ञांना टाकलं मागे

11 वर्षांच्या मुलाने रचला इतिहास; IQ टेस्टमध्ये मिळाले 162 गुण; दिग्गज शास्त्रज्ञांना टाकलं मागे

या मुलाचा बुद्ध्यांक जेष्ठ शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाइन यांच्यापेक्षाही जास्त असल्याचं स्पष्ट झालं आहे.

या मुलाचा बुद्ध्यांक जेष्ठ शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाइन यांच्यापेक्षाही जास्त असल्याचं स्पष्ट झालं आहे.

या मुलाचा बुद्ध्यांक जेष्ठ शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाइन यांच्यापेक्षाही जास्त असल्याचं स्पष्ट झालं आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 20 नोव्हेंबर:  काही मुलं लहानपणापासूनच खूप हुशार आणि चाणाक्ष असतात. आपल्या हुशारीच्या जोरावर ही मुलं शिक्षणात चमकदार कामगिरी करतात. या मुलांना करिअरसाठी अनेक मोठ्या संधी मिळू शकतात. सध्या ब्रिटनमधील असाच एक मुलगा जोरदार चर्चेत आहे. हा मुलगा खूप हुशार असून, गणित या विषयात विशेष प्रवीण आहे. या मुलाने नुकतंच आयक्यू टेस्टमध्ये अविश्वसनीय यश संपादन केलं आहे. या मुलाचा बुद्ध्यांक जेष्ठ शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाइन यांच्यापेक्षाही जास्त असल्याचं स्पष्ट झालं आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत शिक्षण घेण्याची या मुलाची इच्छा आहे.

ब्रिटनमधील एका 11 वर्षांच्या मुलाने इतिहास रचला आहे. मेन्सा आयक्यू चाचणीत त्याला 162 गुण मिळाले आहेत. या मुलाचं नाव आहे युसूफ शाह आणि तो विंग्टन मूर प्रायमरी स्कूलचा विद्यार्थी आहे. या मुलाने जगातील महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन आणि स्टीफन हॉकिंग यांनाही मागे टाकलं आहे, असा दावा केला जात आहे. आईन्स्टाईन आणि हॉकिंग यांचा आयक्यू सुमारे 160 होता, असा अंदाज व्यक्त केला जातो.

`न्यूयॉर्क पोस्ट`ने दिलेल्या माहितीनुसार, माध्यमिक शिक्षणासाठी तयारी करतानाच मेन्साच्या परीक्षाचेही तयारी करण्याचा निर्णय युसूफ आणि त्याच्या पालकांनी घेतला होता. या दोन्हीचा अभ्यासक्रम जवळपास सारखाच आहे. ``तयारीसाठी ही एक कठीण परीक्षा आहे. आयक्यू टेस्टसाठी आम्ही विशेष काही तयारी केली नाही. जे आधी करत होतो, तेच आम्ही केलं,`` असं युसूफचे वडील इरफान शाह यांनी सांगितलं.

ऑक्सफर्डमध्ये शिक्षण घेण्याची आहे इच्छा

यूसुफचे वडील इरफान यांनी `लीड्स लाईव्ह`शी बोलताना सांगितलं, ``माझ्या मुलाला ऑक्सफर्ड किंवा केम्ब्रिज विद्यापीठात गणिताचं शिक्षण घेण्याची इच्छा आहे. यूसुफ लहानपणापासूनच प्रतिभावान आहे. मी अजूनही त्याला सांगतो, की तुझे बाबा अजूनही तुझ्यापेक्षा हुशार आहेत. युसूफ नर्सरीत असताना इतर मुलांच्या तुलनेत लवकर अक्षरं आणि अन्य गोष्टी आत्मसात करत असे. त्याला गणितात चांगली गती आहे, हेदेखील आम्हाला दिसून आलं आहे.``

गोंधळ असूनही चांगले गुण

परीक्षेच्या एका भागादरम्यान, युसूफला सांगण्यात आलं की त्याला तीन मिनिटांत 15 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. परंतु, त्याने 13 मिनिटांत असं चुकून ऐकलं आणि त्यामुळे त्याला प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी वेळ लागला. असं असूनही युसूफनं चांगली कामगिरी केली. युसूफ म्हणाला, ``मी कधी बातम्यांमध्ये झळकेन, असं मला कधीही वाटलं नव्हतं.`` सध्या शाह कुटुंब मुलाच्या यशाचं सेलिब्रेशन करण्याची तयारी करत आहे.

First published:

Tags: Career