मुंबई, 19 सप्टेंबर; चंदीगडमधील एका खासगी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहातून समोर आली आहे. जिथे 60 विद्यार्थिनी अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवण्यात आला होता. यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला. यामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. आपली मुलं होस्टेलवर राहणं कितपत योग्य आहे असा प्रश्न पालकांच्या मनात या घटनेमुळे निर्माण झाला आहे. उच्च शिक्षणादरम्यान अनेक वेळा तुम्हाला राहण्यासाठी वसतिगृहाची गरज भासते. पण कोणत्याही हॉस्टेल किंवा पीजीमध्ये राहायला गेल्यावर अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. तसंच तुमच्या मुलांसाठीही तुम्हाला अनेकदा हॉस्टेल निवडण्याची वेळ येते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या कोणतंही हॉस्टेल निवडताना तुम्ही चेक करणं आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया. सुरक्षेची व्यवस्था वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या सुरक्षिततेबाबत जागरुक असलं पाहिजे. कुठेही एखादा विद्यार्थी त्याचे रेकॉर्डिंग करत आहे असं त्याला वाटलं तर त्यांनी लगेच बोलणं आवश्यक आहे. यासोबतच वसतिगृहात सीसीटीव्ही फुटेज असणे आवश्यक आहे. तसेच पालकांनीही आपला मुलगा किंवा मुलगी हॉस्टेलमध्ये बरोबर आहे ना सुरक्षित आहे ना याची खात्री सतत करत राहणं आवश्यक आहे. Flipkart Jobs: वर्क फ्रॉम होम करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; फ्लिपकार्ट करणार मोठी भरती जेवणाची सोय तुमची मुलं किना मुली हॉस्टेलमध्ये नक्की कुठे राहणार आहेत, तिथे जेवणाची सोय काय आहे हे पालकांनी सतत चेक करत राहणं आवश्यक आवश्यक आहे. किंवा विद्यार्थ्याला स्वतःसाठी स्वयंपाक करायचा असेल तर त्याच्यासाठी काय सुविधा आहेत हेही बघत राहणं आवश्यक आहे. जेणेकरून ते त्यांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करणार नाहीत. वाचनालय आणि क्रीडा सुविधा होस्टेलची निवड करताना तिथे वाचनालय आणि क्रीडा सुविधा उपलब्ध आहेत हेही बघायला हवे. जेणेकरून वाचनालयात खेळू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थ्यांना इनडोअर गेम्स खेळता येतील. यामुळे तुमची मुलं क्रीडा क्षेत्रातही समोर जाऊ शकतील आणि त्यांचं माईंडही फ्रेश राहील.
तसंच वसतिगृहाची निवड करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. वसतिगृहांची सुरक्षा वैशिष्ट्ये कशी आहेत. जर खोलीच्या बाहेर कनेक्टिव्हिटी असेल तर ते किती सामान्य आहे. याशिवाय वॉर्डनची वेळ काय आहे, त्याची वागणूक कशी आहे, या गोष्टींचीही काळजी घ्यायला हवी.