मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Abhi And Niyu: 9-5 जॉब सोडून झाले Content Creator; आता गाजवताहेत तरुणाईच्या मनावर अधिराज्य

Abhi And Niyu: 9-5 जॉब सोडून झाले Content Creator; आता गाजवताहेत तरुणाईच्या मनावर अधिराज्य

 अभि आणि नियू

अभि आणि नियू

या सिरीजमधून आम्ही तुम्हाला अशाच काही टॉप युटूबर्सच्या यशोगाथेबद्दल सांगणार आहोत जे त्यांच्या कन्टेन्टमुळे यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. चला तर मग जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

Youtube म्हंटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात भन्नाट लाईव्ह शोज, जगाच्या काना-कोपऱ्यातील एक से एक व्हिडीओज आणि तुम्हाला सत्ता हवे असेलेले YouTube शॉर्ट्स. जगभरात कोट्यवधी लोकांचे Youtube चॅनेल्स आहेत. यावर निरनिराळ्या प्रकारचे व्हिडीओज अनेकजण अपलोड करत असतात. कोणी कॉमेडी व्हिडीओ तर कोणी डान्सचे, कोणी कलेचे तर कोणी माहितीयुक्त. बहुतांश जण मनोरंजनासाठी व्हिडीओ बघतात आणि अपलोड करत असतात. पण यात असेही काही बोटावर मोजण्यासारखे युटूबर्स असतात जे लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. अर्थात कोणत्याही प्रकारचं वाईट कृत्य न करता तर माहितीयुक्त व्हिडीओ बनवून. या सिरीजमधून आम्ही तुम्हाला अशाच काही टॉप युटूबर्सच्या यशोगाथेबद्दल सांगणार आहोत जे त्यांच्या कन्टेन्टमुळे यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. चला तर मग जाणून घेऊया.

कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यश मिळवायचं असेल तर 'कन्टेन्ट हा नेहमीच राजा असतो' हे गोष्ट लक्षात ठेऊनच काम करावं लागतं. तुमचा कन्टेन्ट चांगला असेल तर तुम्हाला यश मिळतंच. म्हणूनच YouTube च्या कन्टेन्ट विषयी बोलायचं झालं तर 'Abhi And Niyu' चॅनेलचं नाव येणार नाही असं होऊच शकत नाही.

Abhi म्हणजेच अभिराज राजाध्यक्ष आणि Niyu म्हणजेच नियती माविणकुर्वे यांचं नाव ऐकलं नसेल किंवा यांचे व्हिडीओ बघितले नसतील असे लोकं शोधून सापडणार नाहीत. आपला भारत देश आपल्याला का आवडायला हवा याची 100 कारणं असो वा सुभाषचंद्र बोस यांच्या संशयास्पद मृत्यूमागील गूढ सांगणं असो अभि आणि नियू या नवरा बायकोच्या ड्युओने नेहमीच तरुणाईला भुरळ घातली आहे.

कॉमेडी शिवाय कोणताच कन्टेन्ट हिट होत नाही असं म्हणणाऱ्या या जगाला कन्टेन्ट काय असतो हे या जोडीनं दाखवून दिलं आहे. युवा वर्गाला नक्की कोणत्या गोष्टींमध्ये रस आहे, कोणत्या गोष्टींची माहिती असायला हवी हे ओळखून माहितीपूर्ण आणि रिसर्च बेस्ड व्हिडीओ बनवणं 'Abhi And Niyu' यांना चांगलंच जमलंय. पण आपण YouTube वर असं काही करावं अशो आयडिया त्यांच्या डोक्यात आली कशी? त्यांचा हा प्रवास नक्की सुरु झाला कुठून? हे आधी जाणून घेणं आवश्यक आहे.

इंटरनेटच्या या जगात अनेक नकारात्मक गोष्टी घडतात. म्हणूनच या इंटरनेटच्या जगाला सकारात्मक बनवण्याचा आणि लोकांसमोर सकारात्मक बातम्या ठेवण्याचा उद्देश घेऊन या चॅनेलची सुरुवात करण्यात आली अशी माहिती 'Abhi And Niyu' YouTube चॅनेलच्या सुरुवातीला दिली आहे.

तर गोष्ट्य आहे 2019 ची. त्यावेळी अभिराज राजाध्यक्ष (अभि) आणि नियती माविनकुर्वे (नियू) ही आपल्या नेहमीच्या जॉबमधे व्यस्त होते. सकाळी यायचं असं त्यांचं कंटाळवाणं शेड्युल सुरु होतं. मात्र अचानक एक दिवस त्यांनी YouTube वर स्वतःचा एक शो सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी या दोघांनीही आपल्या नोकरीचाही राजीनामा दिला.

आरडी नॅशनल कॉलेज, वांद्रे इथे जाहिरात आणि मास मीडियाचा अभ्यास केल्यानंतर, अभिराज राजाध्यक्ष यांनी स्वतंत्र चित्रपट निर्माता म्हणून काम केलं. 2014 ते 2019 दरम्यान, त्याने HUL, MTV, Kotak Bank, Tata Motors यांसारख्या विविध ब्रँड्ससाठी जाहिराती तयार करण्याचं काम केलं. तर तिकडे नियती माविनकुर्वे या चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि फ्रिलान्स कन्टेन्ट रायटरही आहे. मात्र हे सगळं सोडून या दोघांनी स्वतःचं YouTubeचॅनेल सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि तो यशस्वीही झाला.

कशामुळे व्हायरल झाली जोडी

100 reasons to love India असू देत वा छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर तयार केलेला सर्वांनाच विचार करायला लावणारा व्हिडीओ असू देत. या मराठी जोडीनं मराठीची शान वाढवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. अगदी चीनच्या धोरणांपासून ते क्रिप्टोकरंसीमध्ये गुंतवणूक कशी होते हे सांगण्यापर्यत प्रत्येक विषयाला प्रभावीपणे तरुणाईच्या समोर मांडण्याचं काम या जोडीनं केलं आहे. त्यामुळेच ही जोडी आज संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहे.

YouTube, Instagram, Twitter या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'Abhi And Niyu' यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सध्या YouTube वर त्यांच्या चॅनेलचे तब्बल 30 लाख स्बस्क्रायबर्स आहेत. तर या जोडीचं नाव फोर्ब्सच्या 30 Under 30 या लिस्टमध्येही आलं आहे . 2020 चा Most Impactful Influencer of the Year  हा अवॉर्डही  या जोडीला मिळाला आहे. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरही तरुणाईनं या चॅनेल्सना अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. तसंच असे माहितीयुक्त चॅनल्स हे आजच्या काळाची आणि तरुणाईची गरज आहे.

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर News18lokmat digital घेऊन येत आहे प्राइम टाइम स्पेशल. दररोज सकाळी 9 वाजता तुम्हाला आम्ही काही स्पेशल स्टोरी देणार आहोत. गणेशोत्सव काळातल्या Prime Time special ची थीम आहे - तरुण तुर्क. 25 ते 35 वयोगटातल्या तरुणाईच्या जिव्हाळ्याचे सगळेच विषय आम्ही पुढच्या 10 दिवसात तुमच्यापुढे मांडणार आहोत. दररोज सकाळी 10 च्या आत हे तरुण तुर्कांसाठीचे विषय तुमच्यापर्यंत पोहोचतील.

First published:

Tags: Career, Digital prime time, Success story, YouTube Channel