मुंबई, 22 फेब्रुवारी: कोरोनाकाळात सर्व क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी (Career Opportunity) असतानाही अनेकांना जॉब (Latest Jobs) मिळू शकले नाहीत. काही जणांचे असलेले जॉब्सही गेलेत. मात्र या काळात असं एकच क्षेत्र होतं जे जोमात आणि उत्साहानं काम करत होतं, ते म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्र (Corporate World). Corporate क्षेत्रावर कोरोनाचा कमी परिणाम होण्याचं प्रमुख कारण म्हणजे या क्षेत्रातील जवळजवळ सर्व कर्मचारी हे कोरोनाकाळात घरून काम (Work from Home) करत होते. त्यामुळे आता या क्षेत्रात अनेक करिअरच्या संधी (Career in Corporate World) उपलब्ध होऊ लागल्या आहेत. जर तुम्हीही या क्षेत्रात (How to make career stronger) काम करत असाल तर हे बातमी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Success Tips) देणार आहोत ज्यामुळे तुम्ही Corporate क्षेत्रात घवघवीत यश (How to be successful) मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया. डिजिटल स्किल्स आवश्यक (Digital Skills) कोणाला आवडो किंवा न आवडो पण आता जग डिजिटल मोडकडे वळलं आहे आणि डिजिटायझेशन आणि ऑटोमेशन यासोबतच सर्व गोष्टी डिजिटल झाल्या आहेत. त्यामुळे जर तुम्हाला कॉर्पोरेट क्षेत्रात जॉब हवाय किंवा यश मिळवायचंय तर तुमच्याकडे डिजिटल स्किल्स असणं आवश्यक आहे. येणारी नवीन टेक्नॉलॉजी शिकून समोर जाणं आवश्यक आहे. Naukri आणि LinkedInच नाही तर ‘या’ वेबसाईट्सवरही मिळेल जॉब; करा Search कम्युनिकेशन स्किल्स महत्त्वाच्या (Communication Skills) कॉर्पोरेट जगात टिकून राहायचं असेल तर कंपनी कुठलीही असो तुमच्याकडे चांगले कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी, सहकाऱ्यांशी किंवा क्लायंटशी कशाप्रकारे संवाद साधतात यावर तुमची प्रगती ठरते. म्हणूनच कम्युनिकेशन स्किल्स आवश्यक आहे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स आवश्यक (Problem Solving Skills) एक मौल्यवान कर्मचारी म्हणून, मूळ समस्या ओळखणे आणि त्याचे निराकरण करणे आवश्यक आहे. बहुतेक नोकरीच्या भूमिकेसाठी सेवा अभिमुखता आवश्यक असताना, ज्यामध्ये तुम्ही क्लायंटला जे हवे आहे ते वितरित करता येणं आवश्यक आहे. संस्था अशा कर्मचार्यांचा शोध घेतात जे समस्या ओळखू शकतात आणि हुशारीने सोडवू शकतात. म्हणूच कर्मचाऱ्यांकडे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निक असणं आवश्यक आहे. ज्यामुळे ते येणाऱ्या कोणत्याही समस्येला धीरानं तोंड देऊ शकतील. यामुळे तुमच्या कंपनीत तुमचा प्रभाव पडेल आणि तुमची स्वतःची जागा निर्माण होईल. नोकरीचा पहिला दिवस आणि चेहऱ्यावर टेन्शन? चिंता नको; या टिप्स फक्त तुमच्यासाठी अनॅलिटीकल स्किल्स आवश्यक (Analytical skills) आजकालच्या कॉर्पोरेट क्षेत्रातील जगात Analytical skills असणं खुओ महत्त्वाचं आहे. कॉर्पोरेट जगात डेटाला फार महत्त्वं आहे. त्यामुळे या डेटाचं प्रबंधन करणं खूप महत्त्वाचं असतं. विश्लेषणात्मक कौशल्य या समस्येचे पद्धतशीर आणि वस्तुनिष्ठपणे परीक्षण करण्यात मदत करते. हे शाश्वत समाधानापर्यंत पोहोचण्यासाठी विविध घटकांच्या वैयक्तिक आणि सामूहिक प्रभावाचे परीक्षण करण्यात मदत करतं. आजच्या बदलत्या जगात Analytical skills डेटा विश्लेषणामध्ये रूपांतरित झाली आहेत आणि हे कौशल्य आघाडीवर आहे. म्हणूनच हे स्किल्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.