मुंबई, 24 जुलै: NTA ने अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर JEE मुख्य पहिल्या सत्र परीक्षेचा (JEE Mains Result 2022) निकाल अपलोड केला आहे. देशातील नामांकित अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश मिळवू इच्छिणारे विद्यार्थी जेईई परीक्षेला बसतात. JEE मुख्य सत्र 2 ची परीक्षा उद्यापासून सुरु होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) 25 जुलैपासून जेईई मेन 2022 सत्र 2 परीक्षा सुरू करण्यासाठी सज्ज आहे. जेईई मेन 2022 सत्र 2 ची तारीख 25 ते 30 जुलै आहे. जे विद्यार्थी संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य 2022 साठी बसणार आहेत त्यांनी दिलेल्या परीक्षा मार्गदर्शक तत्त्वांची माहिती असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक तपासून त्यांचे पालन करावे. जेईई मेन 2022 प्रवेशपत्र जारी करण्याबरोबरच, एनटीएने परीक्षेच्या दिवशी काय घेऊन जावे, परीक्षा केंद्रावर काय नेऊ नये, आवश्यक कागदपत्रे आणि बरेच काही यासह सूचना देखील जारी केल्या आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेशपत्र, फोटो ओळखपत्र, पाण्याची बाटली, हँड सॅनिटायझर, मास्क, हातमोजे आणि बॉल पॉइंट पेन सोबत ठेवण्याची परवानगी असेल. 2023 ला ‘या’ तारखेपासून सुरु होणार CBSE 12वीची परीक्षा; असं असेल Exam Pattern
JEE परीक्षा केंद्रावर हे नेऊ नका
जेईई मुख्य परीक्षा केंद्र २०२२ मध्ये या गोष्टींना सक्त मनाई आहे. - कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक उपकरणे - स्टेशनरी/पेपर - पेन्सिल बॉक्स - पर्स/वॉलेट/हँडबॅग - मोबाईल फोन/इयरफोन/मायक्रोफोन/पेजर - कोणतीही धातूची वस्तू - कॅमेरा / टेप रेकॉर्डर परीक्षेच्या दिवसासाठी इतर सूचना विद्यार्थ्यांनी जेईई मेन ऍडमिट कार्ड 2022 आणि वैध आयडी पुरावा परीक्षा केंद्रावर सोबत नेण्यास विसरू नये. -मधुमेहाचा त्रास असलेल्या उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये साखरेच्या गोळ्या/फळे आणि पारदर्शक पाण्याच्या बाटल्या यांसारखे खाण्याचे पदार्थ घेऊन जाण्याची परवानगी असेल. परीक्षा सुरू झाल्यानंतर किंवा परीक्षा संपण्यापूर्वी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षा केंद्रावरील अधिकारी रफ शीट पुरवतील. क्या बात है! ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची बंपर ऑफर; ‘या’ पदांवर मिळेल उत्तम पगाराचा जॉब अडचण असल्यास इथे करा संपर्क एनटीएने जारी केलेल्या नोटीसमध्ये, विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र जारी केल्यानंतर त्यावरील सर्व मार्गदर्शक तत्त्वे काळजीपूर्वक वाचण्यास सांगितले आहे. तसेच, एनटीएने म्हटले आहे की प्रवेशपत्र डाउनलोड करताना उमेदवारांना काही अडचण आल्यास, ०११-४०७५९००० वर संपर्क साधा किंवा jeemain@nta.nic.in वर ईमेल करा. एनटीएने उमेदवारांना इतर कोणत्याही माहितीसाठी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट देण्याचा सल्ला दिला आहे. यापूर्वी, जेईई मुख्य सत्र 1 23 जून ते 29 जून 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते.