मुंबई, 25 जुलै: अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेले CBSE बोर्डाचे दहावी आणि बारावीचे निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले. CBSE बोर्डाकडून यंदा बोर्डाच्या परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेचा सिलॅबस हा दोन्ही टर्म मिळून 50-50% इतका होता. यानुसारच परीक्षा घेण्यात अली होती. टर्म एकचा निकाल CBSE नं बोर्डानं जरी केला होता. मात्र टर्म दोनच्या निकालाबाबत सगळ्यांनाच चिंता होती. CBSE बोर्डानं मूल्यांकनाचा कोणताही फॉर्मुला सांगितलं नव्हता. अखेर 30% - 70% या फॉम्युलानुसार निकाल घोषित करण्यात आलेत. मात्र आता आणि पालक चांगलेच भडकले आहेत. CBSE टर्म एकच्या परीक्षांमध्ये बोर्डानं सर्वच विद्यार्थ्यांना पास केलं होतं. मात्र आता दुसऱ्या टर्ममध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. इतकंच नाही तर ज्या विद्यार्थ्यांना टर्म एकच्या परीक्षेत अधिक गुण मिळाले होते त्या विद्यार्थ्यांना आता ही जास्त मार्क्स मिळतील अशी अपेक्षा होती मात्र त्यांचे मार्क्स कमी झाले आहेत आणि यासाठी ते मूल्यांकन पद्धतीला दोषी ठरवत आहेत. म्हणून पालक आणि शिक्षण आता आक्रमक झाले आहेत. ICSE Results: ICSE बोर्डानं जारी केला 12वीचा निकाल; असा लगेच चेक करा Result
पालक आणि विद्यार्थ्यांनी ऑनलाइन मोहीम सुरू केली आहे आणि ‘न्याय’ मिळवण्यासाठी शिक्षण मंत्रालय, सीबीएसई आणि इतर प्राधिकरणांना पत्रे लिहित आहेत. ट्विटरवर, ट्विटरवर #JusticeforCBSEStudents’ हा हॅशटॅग ट्रेंड केला जात आहे. त्यांच्या मागण्या टर्म 1 आणि टर्म 2 च्या निकालांना 50:50 वेटेजवर आधारित निकाल द्याव्यात अशा आहेत.
“CBSE ने 2021-22 मुलांसोबत अनेक प्रयोग केले आहेत. साथीच्या रोगामुळे या विद्यार्थ्यांना ज्या दर्जाचे शिक्षण मिळायला हवे होते ते दिले गेले नाही. आधीच त्यांना खूप त्रास सहन करावा लागला आहे, आता वेळ आली आहे की अधिकाऱ्यांनी त्यांना संधी आणि दिलासा द्यावा.” असं ट्विट करण्यात आलं आहे.
CBSE has done many experiments with 2021-22 children. The quality of education that these students deserve was not given due the pandemic.
— Nothing (@NITESHK49515798) July 16, 2022
Already they have suffered alot, now it's time that authorities should give them a chance & relief.#CBSEstudentsWantJustice@cbseindia29 pic.twitter.com/nNmQuBZXSe
तसंच अभ्यासक्रम 50:50 असताना निकालासाठी 30:70 का? मला टर्म 1 मध्ये 80% मिळाले पण फायनल मध्ये फक्त 69% मिळाले. कृपया त्याचे पुन्हा पुनर्मूल्यांकन करावे." अशी विनंती करणारं आणि प्रश्न विचारणारं ट्विट एका विद्यार्थ्याने केलं आहे.
#CBSEstudentsWantJustice@cbseindia29 @dpradhanbjp
— Parampreet Sethi (@SethiParampreet) July 24, 2022
Why 30:70 for result when the syllabus was 50:50?
I got 80% in term 1 but got only 69% in final. It should be revaluated again please
काही पालक संघटनांनीहे CBSE ला पत्र लिहिले आहे. “परीक्षेनंतर CBSE आपली मार्किंग स्कीम कशी बदलू शकते?” पत्र विचारते. “विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना टर्म 1 च्या परीक्षेची तयारी करण्यासाठी 8 महिने आणि टर्म 2 साठी फक्त 2-3 महिने मिळाले आहेत. त्यामुळे त्यांना टर्म 1मध्ये अधिक गुण मिळाले आहेत मात्र अभ्यास करायला वेळ मिळालं नाही म्हणून टर्म दोन ढे मार्क्स कमी मिळाले आहेत.”